दरडोई उत्पन्नावरून (GDP) देशाच्या अर्थव्यवस्थेचे निकष लागत असतात. मात्र केवळ 11,000 इतकी लोकसंख्या असलेला तूवालू (Tuvalu) हा जगातील सर्वात लहान देश आहे. काही देशांच्या तुलनेने तुवालूचे दरडोई उत्पन्न जास्त आहे. या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था मत्स्यपालनावर आधारित आहे. तूवालू हे ऑस्ट्रेलिया नजीक पॅसेफिक महासागरावर स्थित बेट आहे. 1978 साली यूनायटेड किंगडम (United Kingdom)
पासून हा देश एक स्वतंत्र झाला. यानंतर देशात घटनात्मक राजेशाही कारभार सुरू झाला.
मत्स्यपालनावर आधारित अर्थव्यवस्था
मत्स्यव्यवसाय विभागाच्या वार्षिक अहवालानुसार तूवालू येथील अर्थव्यवस्था समुद्राशी निगडीत मत्स्य पालनावर आधारित आहे.मत्स्य पालन परवाना मिळवणे हे तूवालूतील काही प्रमुखशासकीय मान्यताप्राप्त कामाईचा स्त्रोत आहे. तूवालू देशाचा जीडीपी 66$ दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. ऑस्ट्रेलियन चलन देशातील कायदेशीर निविदा आहे. जागतिक बँकेच्या मते तूवालू हे उच्च मध्यम उत्पन्न असलेले राष्ट्र आहे.जागतिक बँकेची आकडेवारी सांगते की 2010 मध्ये तुवालूने $31,350,804 एकूण देशांतर्गत उत्पन्नाची नोंद केली. 2009 साली काही प्रमुख देशांनी तूवालूशी मत्स्यकरार केला.यात तैवान, जपान,दक्षिण कोरिया, न्यूझीलंड व युनायटेड स्टेट्स या देशांचा समावेश आहे.या कारारातून तूवालूला 9 दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न आहे. 2013 मध्ये मासेमारीतून मिळणारा महसूल जीडीपी (GDP)पेक्षा 13% जास्त आहे.
तूवालू ट्रस्ट फंडची 1987 साली झाली स्थापना
तूवालू ट्रस्ट फंड (TTF)ची स्थापना 1987 साली करण्यात आली. सुरुवातीला ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांनी यात $27 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली होती. मासेमारी व टीव्ही डॉट डोमेन विक्रीतून मिळणारे उत्पन्न या देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग आहे.