Trick to start bike without key: हल्ली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहण्यापेक्षा अनेक जण टू-व्हीलर(Two-wheeler) अर्थात बाईकला प्राधान्य देतात. त्यामुळे चुकून बाईकची चावी कधी गहाळ झाली, तर हैराण व्हायला होतं. जवळपास मेकॅनिक(Mechanic) नसेल तर अडचण आणखीच वाढते. अशा अडचणीच्या वेळी एक ट्रिक वापरता येऊ शकते. चावीशिवाय बाईक स्टार्ट कशी करायची, याची माहिती जाणून घेऊयात.
हॉटवायर प्रोसेस बद्दल माहितीये का?
बाईकची चावी हरवली तर सर्वप्रथम चावी शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. शोधूनही चावी सापडली नाही तर जवळच्या मेकॅनिकला बोलावतो, आणि तोही नसेल तर आपल्याला हतबल व्हायला होतं. पण तुम्हाला माहित आहे का? चावी शिवाय देखील बाईक सुरू होऊ शकते, या प्रक्रियेला हॉटवायर प्रोसेस(Hotwire Process) असं म्हणतात. सध्याच्या अपडेटेड बाईक मॉडेलमध्ये या प्रोसेसचा वापर करणं वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी वायरिंग कॅप, स्लीव्ह, इग्निशन वायरिंग सिस्टीम आणि स्पीकर वायर याविषयी प्राथमिक माहिती असणं गरजेचं असतं. नाहीतर बाईकचं नुकसान होऊ शकतं. ही प्रक्रिया करताना कोणत्याही बेकायदा गोष्टींचा वापर करू नये. या गोष्टींची पुरेशी माहिती नसेल तर जोखीम पत्करूही नये.
वायर्सच्या कॅप ओळखता यायला हव्यात
सध्या डिजिटल गॅजेट्सच्या वापराच्या अनुषंगाने ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ऑटोमोबाइल कंपन्यांनी प्रगत तंत्रज्ञानासोबत गाड्यांचे उत्पादन सुरू केले आहे. कंपन्या आता बाईकच्या कव्हरमध्ये वायर्सचा जास्त बंडल देतात. त्यासाठी वायर्सच्या कॅप ओळखता यायला हव्यात. कोणत्याही वायरच्या सुरुवातीला आणि शेवटी कॅप्स दिसतात. या कॅप्सची माहिती असेल तर ही प्रक्रिया जलद होऊ शकते. स्लीव्ह हा वायर्स जोडणारा एक भाग असून स्लीव्हमुळे वायर्सची कनेक्शन विभाजित होण्यास मदत होते. बाईकची लॉक सिस्टीम ही वायर्सवरच अवलंबून असते. त्यामुळे चावी योग्य ठिकाणी लावल्यानंतर इंजिन इग्निशनची क्रिया करण्यास सुरूवात करते. बाईकच्या हॉटवायर प्रक्रियेत तीन वायर्सची गरज असून या वायर्स अचूक ओळखल्या तर प्रक्रिया सोपी आणि लवकर होण्यास मदत होते.
अशी करा प्रक्रिया
हॉटवायर प्रोसेस करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हँडलबार थोडासा फिरवला तर वायर्सचा बंच दिसेल. त्यानंतर दोन ते तीन कॅप्स दिसतील. बाईक लेटेस्ट असेल तर वायर्स शोधण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागू शकतो. वायर्स शोधणं ही गोष्ट बाईकच्या मॉडेलवर सुद्धा अवलंबून असून शकते. या वायर्स लाल, हिरवा, निळा, पांढरा, काळा किंवा पिवळा या रंगांच्या असतात. यापैकी इग्निशनची वायर शोधणं अतिशय महत्त्वाचं आहे. वायर्स शोधताना तीन वायर्स कॅपमधल्या स्लीव्हमध्ये जॉइंट केलेल्या दिसून येतील. त्यापैकी एक कॅप ही इग्निशनची, तर उर्वरित इतर पार्ट्सच्या पाहायला मिळतील. लॉकच्या खालच्या बाजूला शोधल्यास या तीन वायर्स सहज सापडतात. या तीन वायर्सचे रंग वेगवेगळेही असू शकतात. इग्निशन कॅप सापडल्यावर सॉकेट हळुवार उघडावे.
यानंतर स्पीकर वायर शोधून काढणे हा अतिशय कठीण टप्पा असतो. सॉकेट उघडल्यानंतर तीन कनेक्शन पाहायला मिळतील. त्यातून स्पीकर वायर वेगळी कडून त्यानंतर इग्निशन भागाकडे लक्ष द्यावे. लॉकपासून येणारा हा भाग वेगळा काढा. इतर कोणताही भाग वेगळा काढू नका. त्यानंतर इग्निशन लॉकमुक्त करण्याचा प्रयत्न करून या वायर्स निर्धास्तपणे हाताळा. यानंतर स्पीकर वायरवर काम करायला घ्या. या वायरचे रिकनेक्शन इग्निशन सेक्शनकडे जाईल. सॉकेटमध्ये स्पीकर वायर यशस्वीपणे जोडू शकलात, तर बाईक लगेच सुरू होईल. या वायरीचे शेवटचे टोक सॉकेटशी जोडा. याकरिता ४ इंचाची वायर बाहेरूनही जोडू शकता. यानंतर तुम्हाला न्यूट्रल इंडिकेटर एलईडी चालू झालेला पाहायला मिळेल. आता इंजिन सुरू करण्यासाठी इग्निशन रेडी आहे, असे समजावे, यानंतर स्टार्ट बटण दाबा. त्यानंतर बाईकमधून आवाज ऐकायला मिळेल. बाईकची बॅटरी डाउन झाली असेल तर स्पार्क होणार नाही. अशा वेळी बाईकला किक मारून बाईकचं इंजिन सुरू होईल. अशा पद्धतीने चावीशिवाय बाईक सुरू करता येऊ शकते.