IRCTC Tour Package: आयआरसीटीसीकडून नेहमी एकापेक्षा एक अप्रतिम टूर पॅकेज येत असतात. हनिमून ट्रिप असो की यात्रा सर्वच टुर आनंद घेण्यासारखे असतात. रामनवमी स्पेशल म्हणून आयआरसीटीसी कडून अयोध्या, प्रयागराज आणि वाराणसीसाठी एक सुंदर पॅकेज आहे. या पॅकेजमध्ये प्रवाशांना थर्ड एसी तिकीट, डिलक्स हॉटेलमध्ये तीन रात्री स्टे, प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गाडी आणि नाश्त्यासह रात्रीचे जेवण दिले जाईल. या बाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
Table of contents [Show]
पॅकेज डिटेल्स
पॅकेजचे नाव | वाराणसी प्रयागराज अयोध्या टूर |
प्रवास मोड | ट्रेन |
स्टेशन | इंदौर (INDB) |
कालावधी | 05 रात्री आणि 06 दिवस |
टूरची तारीख | दर बुधवारी |
जेवण योजना | नाश्ता आणि रात्रीचे जेवण |
पॅकेज प्लॅनिंग
हा टुर इंदौर रेल्वे स्टेशनपासून सुरू होणार आहे. इंदौर रेल्वे स्टेशनपासून प्रवासी महाकाल एक्स्प्रेसने वाराणसीला पोहचतील. दुसऱ्या दिवशी वाराणसीतील हॉटेलमध्ये आराम करतील आणि नंतर सारनाथ आणि काशी विश्वनाथ मंदिराकडे यात्रेसाठी निघेल.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रयागराज जातील. प्रयागराजमध्ये यात्रेकरूंना संगम येथील हनुमान गढी येथे घेऊन जाणार. दुसऱ्या दिवशी रामजन्मभूमी अयोध्येत पोहचतील. रात्री अयोध्येत मुक्काम होईल आणि नंतर दुसऱ्या दिवशी प्रयागराज रेल्वे स्टेशन वरून नाश्ता करून इंदौरला परत येतील.
पॅकेजची किंमत
या पॅकेजमध्ये अयोध्या, प्रयागराज आणि वाराणसीचे दर्शन होणार आहे. या पॅकेजमध्ये प्रवाशांसाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत.
2 ते 3 प्रवाशी ग्रुप ट्विन शेअरिंग 18,400 रुपये | ट्रिपल शेअरिंग 15,100 |
मुलांसाठी एका बेडसाठी 11,900 रुपये | बेडशिवाय 10,750 रुपये |
4 ते 5 प्रवाशांचा ग्रुप ट्विन शेअरिंगमध्ये 15,300 रुपये | ट्रिपल शेअरिंगमध्ये 13,650 रुपये |
लहान मुलांसाठी बेडसाठी 10,450 रुपये | बेडशिवाय 9,300 रुपये |