Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund SIP: या SIP ची जादू कायम, गुंतवणुकदारांना दिलाय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या सविस्तर

Mutual Fund SIP

सध्याच्या काळात सोयीप्रमाणे गुंतवणूक करुन, पैसे कमवायचा सोपा मार्ग म्हणजे SIP होय. त्यामुळे SIP मध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले. मात्र, बऱ्याच फंडमध्ये रिस्कही जास्त असते. त्यामुळे गुंतवणूक करताना, मार्केट रिसर्च आवश्यक ठरते. तो ताण कमी व्हावा म्हणून आम्ही तुमच्यासाठी काही म्युच्युअल फंड घेऊन आलो आहोत, ज्यांनी मागील काही वर्षात चांगले रिटर्न दिले.

Mutual Fund SIP: सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP होय. SIP चे अनेक फायदे आहेत, त्यातला पहिला म्हणजे तुम्हाला नियमित बचत करायची सवय लागते. तसेच, तुम्हाला वेगवेगळ्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणुकीची संधी मिळते. त्यामुळे रिस्क कमी होऊन चांगला रिटर्न मिळायला मदत होते. 

या सर्व गोष्टींमुळे SIP ची लोकप्रियता वाढली असून तिच्यामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण ही वाढले आहे. तसेच, तुम्ही तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक करु शकता, हेही एक महत्वाचे कारण आहे. आज आम्ही तुमच्यासाठी  मागील काही वर्षात टाॅप परफाॅर्म करणारे फंड घेऊन आलो आहोत. जे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा निर्णय घ्यायला मदत करु शकेल.

क्वांट अ‍ॅक्टिव्ह फंड डायरेक्ट-ग्रोथ

मार्केटमध्ये गेल्या काही वर्षापासून गुंतवणुकदारांना सतत चांगला रिटर्न क्वांट म्युच्युअल फंड देत आहे. या फंडचा उद्देश दीर्घ काळात नफा मिळवून देणे आहे. हा ओपन एंडेड इक्विटी फंड असून या फंडची प्रामुख्याने मटेरियल आणि केमिकल क्षेत्रात गुंतवणूक आहे. तसेच, हा फंड इक्विटी बेस असून हाय रिस्कमध्ये आहे. 

तरी या फंडने (Quant Active Fund Direct-Growth) प्रत्येक तीन वर्षात दुप्पट रिटर्न दिला आहे. त्यामुळे हे या फंडचे खूप मोठे यश आहे. जानेवारी 2013 मध्ये या फंडाची सुरूवात करण्यात आली होती. आता या फंडाचे AUM मूल्य 3,556 कोटी रुपये आहे. या फंडाचा एक्सपेन्स रेशो 0.58 टक्के आहे. या फंडाने गुंतवणुकदारांना गेल्या वर्षभरात 15 टक्के आणि पाच वर्षात 24 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे.

पीजीआयएम इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंड

या फंडचा उद्देशही दीर्घ काळात चांगला नफा मिळवून देणे आहे. या फंडची सर्वाधिक गुंतवणूक मटेरियल आणि कन्झ्युमर स्टेपल्स सेक्टरमध्ये आहे. हा फंड (PGIM India Midcap Opportunities Fund) देखील हाय रिस्कमध्ये असून या फंडाने गेल्या पाच वर्षात 20 टक्क्यांहून अधिक रिटर्न मिळवून दिला आहे. या फंडाच्या AUM ची साईज 7,558 कोटी रुपये आहे. तसेच, या फंडाचा एक्सेपेन्स रेशो 0.44 टक्के आहे. जे अन्य मिडकॅप म्युच्युअल फंडांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

पराग पारीख फ्लेक्सी कॅप फंड ग्रोथ

PPFAS म्युच्युअल फंड दीर्घ काळाच्या भांडवलातून नफा मिळवण्यासाठी 13 मे 2013 ला लाॅंच करण्यात आला. तेव्हापासून अजूनपर्यंत या फंडाने गुंतवणुकदारांना नाराज केले नाही. या फंडात गुंतवलेला पैसा दर तीन वर्षांनी दुप्पट होत आहे. ही कंपनी मुख्यता कन्झ्युमर स्टेपल्स, टेक्नॉलॉजी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात गुंतवणूक करते. 

सध्या AUM ची साईज 40,760 कोटी रुपये आहे. तसेच, या फंडाचा एक्सपेन्स रेशो 1.47 टक्के आहे. या फंडात गुंतवणूक करणे जास्त रिस्की असले तरी या फंडातील SIP गुंतवणुकीने मागील पाच वर्षात 74 टक्के रिटर्न दिला आहे. तर गेल्या वर्षभरात या फंडाने (Parag Parikh Flexi Cap Fund Growth) 18 टक्के रिटर्न दिला आहे.

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)