Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Saving Mutual Funds : जाणून घ्या टॅक्समध्ये सवलत मिळवून देणारे सर्वोत्तम म्युच्युअल फंड

Tax Saving Mutual Funds : जाणून घ्या टॅक्समध्ये सवलत मिळवून देणारे सर्वोत्तम म्युच्युअल फंड

ELSS ही म्युच्युअल फंडमधील अशी योजना आहे; ज्याद्वारे गुंतवणूकदारांना 80C अंतर्गत टॅक्समध्ये सवलत मिळते. या फंडद्वारे मिळणाऱ्या परताव्याचा दर हा वार्षिक 12 ते 14 टक्के असू शकतो. गेल्या वर्षभरात टॅक्समध्ये सवलत देणाऱ्या अनेक म्युचुअल फंड (Tax Saving Mutual Funds )योजनांमधून गुतंवणूकदारांना जवळपास 20% परतावा मिळाला आहे. त्याचीच माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

तुम्हाला जर चांगला परतावा मिळवून देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ELSS म्युच्युअल फंडाची निवड करू शकता. चांगल्या परताव्यासह टॅक्समध्ये सवलत मिळवून देणारी योजना म्हणून ELSS म्युचुअल ही एक चांगली योजना मानली जाते. ईलएसएस (ELSS)मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आयककर कायद्यातील कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. याच पार्श्वभूमीवर आज आपण गेल्या एक वर्षभरात (जून 2023 पर्यंत) कोणकोणत्या कर बचत करणाऱ्या म्युच्युअल फंडामध्ये (Mutual Funds) सर्वोत्तम परतावा मिळाला आहे, याची माहिती जाणून घेऊयात.

ELSS ही म्युच्युअल फंडमधील अशी योजना आहे; ज्याद्वारे गुंतवणूकदारांना 80C अंतर्गत टॅक्समध्ये सवलत मिळते. या फंडद्वारे मिळणाऱ्या परताव्याचा दर हा वार्षिक 12 ते 14 टक्के असू शकतो. फायनान्शियल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या वर्षभरात पुढील काही कर सवलत देणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांनी गुतंवणूकदारांना जवळपास 20% परतावा मिळवून दिला आहे.

मोतीलाल ओसवाल लाँग टर्म इक्विटी फंड 

मोतीलाल ओसवाल लाँग टर्म इक्विटी फंडाच्या डायरेक्ट प्लानने गुंतवणूक दारांना तब्बल 34.09% परतावा दिला आहे. तर रेग्युलर प्लॅनने एका वर्षात 32.45% परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी 500 एकूण परतावा निर्देशांकाचा(TRI) मागोवा (किमतीतील बदल, लाभांश आणि व्याज इत्यादी) घेते. या योजनेने गुंतवणूकदारंना एका वर्षात 24.44% परतावा दिला आहे.

SBI लाँग टर्म इक्विटी फंड

SBI लाँग टर्म इक्विटी फंड (SBI Long Term Equity Fund) याच्या डायरेक्ट प्लॅनने एकूण 33.07% परतावा दिला आहे. तर रेग्युलर प्लॅनने एका वर्षात 32.21% परतावा दिला आहे. एसबीआय लाँग टर्म योजना S&P BSE 500 च्या एकूण परतावा निर्देशांकाचा (TRI) मागोवा घेते. या योजनेतून गुंतवणूक दारांना एका वर्षात 24.50% परतावा प्राप्त झाला आहे.

जेएम टॅक्स गेन फंड

जेएम टॅक्स गेन फंडाच्या डायरेक्ट योजनेने 30.97% परतावा दिला आहे तर नियमित योजनेने एका वर्षात 39.71% परतावा दिला आहे. योजना S&P BSE 500 एकूण परतावा निर्देशांकाचा मागोवा घेते. यामध्ये गुतंवणूकदारांना एका वर्षात 24.50% परतावा मिळाला आहे.

ITI लाँग टर्म इक्विटी फंड

ITI लाँग टर्म इक्विटी फंडाच्या डायरेक्ट योजनेने 30.14% परतावा दिला आहे तर नियमित योजनेने एका वर्षात 27.66% परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी 500 एकूण परतावा निर्देशांकाचा मागोवा घेते, ज्याने एका वर्षात 24.44% परतावा दिला आहे.

एचएसबीसी ELSS फंड

HSBC ELSS फंडाच्या डायरेक्ट योजनेने 29.55% परतावा दिला आहे. तर रेग्युलर योजनेने एका वर्षात 28.51% परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी 500 एकूण परतावा निर्देशांकाचा मागोवा घेते. ज्याने एका वर्षात 24.44% परतावा दिला आहे.

कोटक टॅक्स सेव्हर फंड

कोटक टॅक्स सेव्हर फंडाच्या डायरेक्ट योजनेने 29% परतावा दिला आहे. तर रेग्युलर योजनेने एका वर्षात 27.32% परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी 500 एकूण परतावा निर्देशांकाचा मागोवा घेते. या योजनेतून गुंतवणूकदारांना एका वर्षात 24.44% परतावा मिळाला आहे.

बंधन टॅक्स अॅडव्हांटेज (ELSS)फंड  

बंधन टॅक्स अॅडव्हांटेज (ELSS) फंडाच्या डायरेक्ट प्लॅन योजनेने 29.24% परतावा दिला आहे. तर रेग्युलर प्लॅनने गुंतवणूकदारांना एका वर्षात 27.74% परतावा दिला आहे.ही योजना S&P BSE 500 एकूण परतावा निर्देशांकाचा मागोवा घेते. यामध्ये गुंतवणूकदारांना एका वर्षात 24.50% परतावा मिळाला आहे.

(डिसक्लेमर: शेअर बाजार/म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स /म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)