Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top Crypto Rates Today: बिटकॉइनमध्ये झाली प्रचंड वाढ , जाणून घ्या क्रिप्टो करन्सीजचे आजचे दर

Top Crypto Price Today

Top Crypto Rates Today: वर्ल्ड क्रिप्टो मार्केटमध्ये मागील आठवडाभरात तेजीची लाट धडकली आहे. बिटकॉइन सह प्रमुख क्रिप्टो करन्सीच्या किंमती मोठी वाढ झाली आहे.

चीनमधील कोरोनाचा उद्रेक आणि जगभरात निर्माण झालेल्या अस्थिरतेने गुंतवणूकदारांनी क्रिप्टो चलनांकडे धाव घेतली आहे. क्रिप्टो करन्सींच्या किंमती मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सर्वात महागडा असलेल्या बिटकॉइनचा भाव 21000 डॉलर इतका वाढला आहे. त्यात आज 2% वाढ झाली.

क्रिप्टो मार्केटमध्ये आलेल्या तेजीच्या लाटेचा फायदा बिटकॉइनला झाला आहे. गेल्या सात दिवसांत बिटकॉइनचा भाव तब्बल 24% वाढ झाली. त्यापूर्वी बिटकॉइनचा भाव 16000 ते 17000 डॉलर या दरम्यान होता. आज सोमवारी बिटकॉइनचा भाव 2% ने वाढला आणि तो 21121 डॉलर झाला. 8 नोव्हेंबर 2022 नंतर पहिल्यांदाचा बिटकॉइनच्या किंमतींत इतकी वाढ झाली आहे. कोरोना संकट काळात बिटकॉइनसह सर्वच प्रमुख क्रिप्टो चलनांचे दर रेकॉर्ड स्तरावर गेले होते. नोव्हेंबर 2021 मध्ये क्रिप्टोचा भाव 69000 डॉलर या सार्वकालीन उच्चांकी पातळीवर गेला होता.

आठवडाभरात क्रिप्टो मार्केटच्या उलाढालीत तब्बल 1 लाख कोटी डॉलर्सची वाढ झाली. कॉइनगेकोच्या आकडेवारीनुसार मागील 24 तासांत क्रिप्टो मार्केट उलाढाल 2% ने वाढली असून ती 1.04 ट्रिलियन डॉलर्स इतकी झाली आहे.

बिटकॉइननंतर दुसरा लोकप्रिय क्रिप्टो असलेल्या इथेरियमच्या किंमतीत 2% वाढ झाली. आज इथेरियमचा भाव 1566 डॉलर इतका होता. शिबू इनू कॉइनचा भाव 0.0000010 डॉलर इतका आहे. तिथेर , स्टेलर, एक्सआरपी, पोलकाडॉट, सोलाना, अलव्हान्चे, पॉलीगॉन, ट्रोन, लिटेकॉइन या छोट्या क्रिप्टो करन्सींच्या किंमतीत मागील 24 तासात वाढ झाली आहे.

अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीचे सत्र थांबवले जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील महागाई कमी झाली आहे. त्यामुळे बँकेकडून व्याजदर वाढीचा वेग कमी केला जाईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. यामुळे तेथील शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. नॅसडॅक 100 सलग सहाव्या सत्रात वधारला होता.