अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने 0.50% ने व्याजदर वाढवला आहे. नजीकच्या काळात महागाईचा जोर आणखी वाढेल, अशी भीती फेडरल रिझर्व्हने व्यक्त केली. त्याचे पडसाद भांडवली बाजारात आणि क्रिप्टो मार्केटमध्ये उमटले. आज गुरुवारी 15 डिसेंबर 2022 रोजी बिटकॉइनसह प्रमुख क्रिप्टो कॉइन्सच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली.
जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टो चलन असलेल्या बिटकॉइनच्या किंमतीत आज 4% घसरण झाली. बिटकॉइनचा भाव 17724.9 डॉलर इतका खाली आला आहे. बिटकॉइनमध्ये ट्रेड व्हॉल्यूम 26.4 बिलियन डॉलर इतका होता. इथेरियमच्या किंमतीत देखील आज घसरण झाल्याचे दिसून आले. इथेरियमचा भाव 2% ने कमी झाला असून तो 1292.1 डॉलर इतका आहे. इथेरियमचे बाजार भांडवल 158.1 बिलियन डॉलर इतके आहे. मागील 24 तासांत इथेरियमची 8.3 बिलियन डॉलर्सची उलाढाल झाली.
मेमेबेस्ड व्हर्च्युअल करन्सी असलेल्या डॉजकॉइनच्या किंमतीत 4.17% घसरण झाली आहे. मात्र डॉजकॉइनमध्ये चांगली उताढाल दिसून आली. डॉजकॉइनचा ट्रेडिंग व्हॉल्यूम 592.6 मिलियन डॉलर्स इतका होता. सोलाना या कॉइनचा भाव 14.2 डॉलर इतका आहे. त्यात 2.3% घसरण झाली.शिबू इनू या कॉइनमध्ये 3.6% घसरण झाली आहे. याशिवाय लिटेकॉइनचा भाव 5% ने कमी झाला.
जागतिक पातळीवर क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणुकीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. FTX चा संस्थापक आणि माजी सीईओ सॅम बँकमन फ्रेड याची नुकताच पोलिसांकडून अटक करण्यात होती. FTX एक्सचेंज दिवाळखोरीत गेल्यानंतर अमेरिकेत क्रिप्टोबाबत प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली आहे.त्यातच बायनान्स या क्रिप्टो एक्सचेंजचा प्रमुख चँगपेंग झाओ यांनी कर्मचाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. गुंतवणूकदारांकडून बायनान्स USDC मधून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यापार्श्वभूमीवर येणारा काळ कठिण असेल, असे मत झाओ याने कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यक्त केले.