जीवन विम्यामध्ये टर्म इन्शुरन्स प्लॅन घेणारा एक मोठा वर्ग आहे. जीवन विम्याचा मुख्य हेतू साध्य करणारा म्हणून टर्म इन्शुरन्स प्लॅनकडे बघितले जाते. ज्याच्यावर कुटूंबाची जवाबदारी आहे. अशा व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विम्याच्या रकमेमुळे आर्थिक आधार प्राप्त होतो.
टर्म इन्शुरन्सची निवड करताना क्लेम सेटलमेंट रेश्यो, वार्षिक प्रीमियम, विम्याची रक्कम यांसारख्या मुद्द्याचा विचार केला जातो. चला तर मग, सध्याचे 5 सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स प्लॅन कोणते आहेत ते जाणून घेऊया. (Top 5 term insurance plan) या सर्व योजनांचा वार्षिक प्रीमियमची रक्कम 30 वर्षाची व्यक्ती आणि 30 वर्षाचा कालावधी समोर ठेऊन सामान्यपणे मांडलेली आहे. आपलं वय, आर्थिक क्षमता, आपल्यावरील अवलंबित्व आणि विम्याची रक्कम याचा विचार करणे आवश्यक असते. लवकर विमा सुरु केल्यास प्रीमियम कमी राहतो. त्यामुळे टर्म इन्शुरन्स घ्यायचा असल्यास तो शक्यतो कमी वयातच घेणे योग्य मानले जाते.
Table of contents [Show]
- एचडीएफसी लाईफ क्लिक टू प्रोटेक्ट लाईफ (HDFC Life Click 2 Protect Life)
- आयसीआयसीआय प्रू आईप्रोटेक्ट स्मार्ट (ICICI Prudential iProtect Smart Term Plan)
- मॅक्स लाईफ स्मार्ट सिक्योर प्लस प्लॅन (Max Life Smart Secure Plus Plan)
- टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स संपूर्ण रक्षा सुप्रीम (Tata AIA Sampoorna Raksha Supreme)
- आदित्य बिर्ला लाईफ शिल्ड प्लॅन (ABSLI Life Shield Plan)
एचडीएफसी लाईफ क्लिक टू प्रोटेक्ट लाईफ (HDFC Life Click 2 Protect Life)
एचडीएफसी लाईफ क्लिक टू प्रोटेक्ट लाईफ या टर्म प्लॅनचा क्लेम सेटलमेंट रेश्यो 98.01 टक्के इतका आहे. 50 लाखांपासून पुढे अमर्यादित विम्याची रक्कम आहे. 7 हजार 185 रुपये इतका वार्षिक प्रीमियम आहे. यात कंपनीकडून 9 विविध प्लॅन्स ऑफर केले जातात. शिवाय यात Top Up कव्हर देखील मिळते. महिलांसाठी स्पेशल प्रिमीयम रेट आहे.
आयसीआयसीआय प्रू आईप्रोटेक्ट स्मार्ट (ICICI Prudential iProtect Smart Term Plan)
आयसीआयसीआय प्रू आईप्रोटेक्ट स्मार्ट या टर्म प्लॅनचा क्लेम सेटलमेंट रेश्यो 97.90 टक्के इतका आहे. 50 लाखांपासून पुढे अमर्याद इतकी विम्याची रक्कम आहे. परवडणाऱ्या दरात 360 डिग्री कव्हरेज या पॉलिसीतून मिळते, असा दावा कंपनीने केला आहे. या योजनेत 8 हजार 21 रुपये इतका वार्षिक प्रीमियम आहे. चार पेआऊट ऑप्शन आणि प्रिमीयम भरण्यासाठी लवचिक पर्याय उपलब्ध आहे.
मॅक्स लाईफ स्मार्ट सिक्योर प्लस प्लॅन (Max Life Smart Secure Plus Plan)
मॅक्स लाईफ स्मार्ट सिक्योर प्लस प्लॅन या योजनेचा क्लेम सेटलमेंट रेश्यो अन्य चार प्लॅनच्या तुलनेत जास्त आहे. 99.35 टक्के इतका याचा क्लेम सेटलमेंट रेश्यो आहे. 25 लाखांपासून ते साडेतीन कोटी रुपयापर्यंत विम्याची रक्कम आहे. 6 हजार 95 रुपये इतका वार्षिक प्रीमियम आहे. या योजनेत पॉलिसीधारक मृत्यूपश्चात लाभाचा पर्याय निवडता येईल. अपघाताबाबत विमा कव्हरचा पर्याय आहे. महिलांना कमी प्रिमीयम ऑफर केला जातो.
टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स संपूर्ण रक्षा सुप्रीम (Tata AIA Sampoorna Raksha Supreme)
टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स संपूर्ण रक्षा सुप्रीम या प्लॅनचा क्लेम सेटलमेंट रेश्यो 98.02 टक्के इतका आहे. 50 लाख ते अमर्याद इतकी विम्याची रक्कम आहे. 6 हजार 844 इतका वार्षिक प्रीमियम आहे. वयाच्या 100 वर्षांपर्यंत विमा कव्हर मिळते. वर्षाकाठी 46800 रुपयांची कर बचत आहे. त्याशिवाय 4 तासांत दावा सेटल्ड केला जातो.
आदित्य बिर्ला लाईफ शिल्ड प्लॅन (ABSLI Life Shield Plan)
या प्लॅनचा क्लेम सेटलमेंट रेश्यो 98.04 टक्के इतका आहे. 50 लाख ते अमर्याद इतकी विम्याची रक्कम आहे. 5 हजार 591 रुपये इतका वार्षिक प्रीमियम आहे. ग्राहकांच्या गरजांनुसार 8 प्लॅन्स उपलब्ध आहेत. प्रिमीयम भरण्यासाठी चार पर्याय आहेत. Online आणि Offline ही पॉलिसी खरेदी करता येते.