Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Options : नोकरदार महिलांना गुंतवणूक करण्यासाठी 'हे' 5 पर्याय फायदेशीर ठरू शकतात

Investment Options :  नोकरदार महिलांना गुंतवणूक करण्यासाठी 'हे' 5 पर्याय फायदेशीर ठरू शकतात

Image Source : www.business-standard.com

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या महिलांनी त्यांच्या उत्पन्नाचा काही हिस्सा भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक करणे हे फायद्याचे ठरू शकते. यासाठी आज आपण नोकरदार महिलांना कशाप्रकारे आर्थिक गुंतवणूक करता येईल यासाठी कोणकोणते फायदेशीर पर्याय आहेत, त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

भारतात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या नोकरदार महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्या फक्त नोकरीच करत नाहीत तर कामाच्या ठिकाणी मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत कुटूंबही सांभाळत आहेत. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या महिलांनी त्यांच्या उत्पन्नाचा काही हिस्सा भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक करणे हे फायद्याचे ठरू शकते. यासाठी आज आपण नोकरदार महिलांना कशाप्रकारे आर्थिक गुंतवणूक करता येईल यासाठी कोणकोणते फायदेशीर पर्याय आहेत त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

राष्ट्रीय पेंशन योजना

राष्ट्रीय पेंशन योजना (NPS) नागरिकांना सेवानिवृत्तीसाठी बचत करण्याची सवय लावण्यासाठी मदत करते. भारतातील प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात सेवानिवृत्ती उत्पन्न मिळवून देण्याच्या समस्येवर शाश्वत उपाय म्हणून भारत सरकारकडून ही पेंशन योजना सुरू करण्यात आली आहे. नोकरदार महिलांना गुंतवणुकीसाठी हा एका चांगला आणि फायदेशीर पर्याय आहे. जर तुम्ही खासगी नोकरी करत असाल तरी देखील तुमच्यासाठी राष्ट्रीय पेंशन योजनेतून (National Pension Scheme) पेंशनची तरतूद होऊ शकते. ही एक मार्केट लिंक स्कीम आहे. यातील रक्कम ही इक्विटी, कॉर्पोरेट बाँड्स, लिक्विड फंड, सरकारी बॉण्ड्स इत्यादीमध्ये गुंतवली जाते. गुतंवणूकदारची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यातील 60 टक्के रक्कम काढता येते. तर 40 % रक्कम ही पेन्शन स्वरूपात प्राप्त होते.


मुदत ठेवी Fixed Deposits

मुदत ठेवीचा गुंतवणूक पर्याय तुमच्या पैशाचे रक्षण करण्याचा आणि योग्य परतावा मिळवण्याचा सर्वोत्तम पर्याय समजला जातो. कारण यातून तुमच्या पैशांची केवळ बचत होत नाही, तर त्यामधून मोठ्या प्रमाणात परतावा देखील मिळतो. मुदत ठेव ही एखाद्या बँकेकडे निर्धारित कालावधीसाठी आणि मुदतीच्या आत काढता येणारी आर्थिक ठेव योजना आहे. मुदत संपल्यानंतरच तुम्हाला जमा केलेली रक्कम काढता. मुदत ठेवींवर बँकाकडून चांगला व्याजदर मिळतो. त्यामुळे तुम्हाला मिळणार परतावा ही चांगला आहे. तसेच तुमच्या ठेवीची मुदत संपल्यानंतर तुम्ही ती रक्कम काढू शकता अथवा पुन्हा नव्या मुदत ठेवीत ठेवता येते. भविष्याच्या दृष्टीने मुदत ठेवीमधील गुंतवणूक तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवते.

म्युच्युअल फंड/ एसआयपी Mutual Fund /SIP 

गुंतवणूकदारास एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याऐवजी एसआयपीद्वारे(SIP) म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा तुम्ही विचार करू शकता. तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर आधारित, तुम्ही इक्विटी, डेट किंवा हायब्रीड फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. SIP हा एक किफायतशीर आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय आहे. त्याच बरोबर तुम्हाला  करामधून सवलत देणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांमध्येही (इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम ELSS) गुंतवणूक करता येईल. यातून तुम्हाला योग्य परतावाही मिळेल आणि टॅक्समधून सवलतही मिळेल मध्ये गुंतवणुकीचा विचार करावा लागेल.

सोने - Gold

सोने हे आजपर्यंतच्या सर्वोत्तम गुंतवणुकींपैकी एक आहे आणि आहे. सोन्यामधील गुंतवणुकीचे मूल्य एका महिलेपेक्षा चांगले कोण समजेल? सोन्यात गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत. ज्यात दागिने, नाणी, बार, गोल्ड एक्सचेंज, गोल्ड फंड, डिजिटल गोल्ड इत्यादींचा समावेश आहे. सोन्यात केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही. महागाईबरोबर सोन्याचे मूल्य वाढत जाणारे असते. त्यामुळे नोकरदार महिलांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा देखील एक चांगला पर्याय आहे.

आरोग्य विमा Health Insurance

आरोग्य विमा हा पॉलिसी धारकास भविष्यातील आरोग्य विषयक आणिबाणीच्यावेळी खर्चाची जोखीम कव्हर करते. आर्थिक स्वावलंबत्व स्वीकारत असताना आपणास आपल्या कुटुंबाचे तसेच आपल्या स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्या पार्श्वभूमीवर भविष्यातील आरोग्य विषयक धोक्यांवर होणारा खर्चाला कव्हर करण्यासाठी सर्वसमावेशक आरोग्य विमा काढणे फायद्याचे ठरते. आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विमाही सर्वोत्तम गुंतवणूक ठरू शकते.