जीवनावश्यक वस्तू महागल्यास त्याच्या सर्वसामन्यांच्या अर्थकारणाला मोठा फटका बसतो. सध्याच्या स्थितीत तरकारीचे मार्केट चांगलेच वधारले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. एरव्ही कांद्याच्या भाववाढीने सर्वसामान्याच्या डोळ्यात पाणी येते. मात्र यंदा टोमॅटोचे भाव (Tomato Price) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. दरम्यान टोमॅटोच्या भाववाढीची नेमकी कारणे काय आहेत, कोणकोणत्या राज्यात टोमॅटो महागला आहे, याबाबतची माहिती आपण जाणून घेऊ या.
टोमॅटोला 100 रुपयांपेक्षा जास्त दर : Tomato prices reaches Rs 100 per kg
सामान्यत: पावसाळ्यात भाज्यांचे दरामध्ये घसरण होते. मात्र सध्य स्थितीत मान्सून लाबल्याने भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. मार्केटमध्ये विशेषत: टोमॅटोच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मे महिन्यात बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर हे 3-5 रुपये किलो इतके होते. मात्र जून महिन्या हेच दर 100 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. देशभरातील मुंबई, चेन्नई, बंगळुरू दिल्ली,हैदराबाद, लखनऊ, कोची यासह विविध बाजारात टोमॅटोचे भाव 80 ते 120 रुपयांवर पोहोचले आहेत.
टोमॅटोच्या देशभरातील किमती -
ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडील आकडेवारी नुसार 25 जून पासून टोमॅटोच्या दरामध्ये 40 रुपये प्रति किलो दराने वाढ झाली. त्यानंतर टोमॅटोचे दर 60 ते 75 रुपये प्रतिकिलो झाले होते. केरळामध्ये हे दर 113 रुपये किलोवर पोहोचले होते.त्याचप्रमाणे बंगळुरू, कानपूर, मुंबई, हैदराबाद मध्ये टोमॅटोचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत.
राज्य | दर - प्रति किलो | राज्य | दर - प्रति किलो |
महाराष्ट्र | 100 रुपये | झारखंड | 50-55 रुपये |
उत्तर प्रदेश | 120 रुपये | बंगाल | 100रुपये |
गुजरात | 90-100 | आंध्र प्रदेश | 100 रुपये |
हरियाणा | 70-80 रुपये | बिहार | 70- 80 रुपये |
ओडिशा | 120 रुपये | केरळ | 60- 90 रुपये |
तेलंगाना | 80- 100 रुपये | कर्नाटक | 100 रुपये |
पावसामुळे वाढले दर - Price of tomatoes rises due to heavy rainfall.
अनेक राज्यात वाढत्या तापमानामुळे टोमॅटो उत्पादनात घट झाली होती. त्यातच बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या पावसाने गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील टोमॅटोच्या उत्पादनात मोठी घट झाली.परिणामी बाजारातील टोमॅटोची आवक घटल्याने टोमॅटोचे भाव वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यातच उशिरा दाखल झालेल्या मान्सूचाही टोमॅटोच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दराने शंभरी गाठल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.