BCL Industries Stocks: तुम्हीही शेअर बाजारात(Share Market) एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला त्यातून मिळणाऱ्या परताव्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका कंपनीबद्दल सांगणार आहोत, ज्या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदाराला मालामाल करून सोडले आहे. त्या कंपनीचे नाव आहे बीसीएल इंडस्ट्रीज (BCL Industries). या कंपनीच्या शेअर्सना आज 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट मिळाले आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
3 वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 1100 टक्क्यांची तेजी
गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. तसेच 6 महिन्यांपूर्वी, ज्यांनी BCL Industries वर विश्वास दाखवत गुंतवणूक केली, त्यांची गुंतवणूक व्हॅल्यू 2 टक्क्यांनी घसरली होती. मात्र, गेल्या एका वर्षात या कंपनीच्या गुंतवणूकदारांना 8 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. मार्च 2020 मध्ये या कंपनीच्या एका शेअरची किंमत 31 रुपये होती, जी आता 371 रुपयांवर पोहोचली आहे. याचाच अर्थ या 3 वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 1100 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.
1 लाखाचे 12 लाख
ज्या गुंतवणूकदारांनी मार्च 2020 मध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली होती त्या गुंतवणूकदारांचे नशीब चमकले आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 3 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्या गुंतवणूकदारांच्या परताव्याची रक्कम आता वाढून 12 लाख रुपयांवर पोहोचली असणार आहे. या मल्टीबॅगर स्टॉकचा 52 आठवड्यांती उच्चांक एनएसईवर(NSE) 530 रुपये तर निचांक 278.65 रुपये इतका आहे. तसेच, कंपनीचे मार्केट कॅप 896 कोटी रुपये एवढे आहे.