Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Personal Loan: 'ही' सरकारी बँक देत आहे 20 लाख रुपयांपर्यंतचे डिजिटल पर्सनल लोन

Digital Personal loan

Digital Personal Loan: बँक ऑफ महाराष्ट्रने एंड-2-एंड डिजिटल पर्सनल लोन सर्विस सुरू केली आहे. बँकेचे ग्राहक डिजिटल पद्धतीने पर्सनल लोन घेऊ शकतील.

Digital Personal Loan: बँक ऑफ महाराष्ट्रने शुक्रवारी ग्राहकांसाठी अनेक नवीन सर्विस लॉन्च करण्याची घोषणा केली. यामध्ये डिजिटल पर्सनल लोन  आणि अपडेट मोबाइल बँकिंगचा समावेश आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने एका निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांचा अनुभव सुलभ करण्यासाठी आणि बँकेचे डिजिटायझेशन बळकट करण्यासाठी बँकेने अनेक क्षेत्रांमध्ये ग्राहकांना डिजिटल पद्धतीने पर्सनल लोन सर्विस देणे सुरू केले आहे

आपले जग अधिकाधिक डिजिटल होत आहे. आता तुमचा फोन फक्त कॉल्स किंवा मेसेजसाठी उपयुक्त नसून तो बँकेच्या कामासाठी आणि व्यवहारांसाठी आरामात वापरता येतो. हे लक्षात घेऊन सरकारी क्षेत्रातील बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवीन डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत. यामध्ये डिजिटल पर्सनल लोनपासून ते अपडेट मोबाइल बँकिंगपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे.

या शहरांतील ग्राहकांना मिळणार 20 लाखांपर्यंत लोन 

बँक ऑफ महाराष्ट्रने एंड-2-एंड डिजिटल पर्सनल लोन सर्विस  सुरू केली आहे. याचा अर्थ बँकेचे ग्राहक केवळ डिजिटल पद्धतीने पर्सनल लोन  घेऊ शकतील. मात्र, बँकेने ही सेवा केवळ काही विशेष मंडळांमध्ये सुरू केली आहे.

बँकेच्या म्हणण्यानुसार, पुणे पश्चिम, पुणे शहर, पुणे पूर्व, बंगळुरू, कोलकाता, पाटणा आणि चंदीगड या मंडळांसाठी डिजिटल वैयक्तिक कर्जाची सेवा सुरू केली जात आहे. पीटीआयच्या बातमीनुसार, या सर्कलचे ग्राहक कोणत्याही त्रासाशिवाय 20 लाख रुपयांपर्यंतचे लोन  सहजपणे घेऊ शकतील.

बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या मोबाईल बँकिंग अॅपमध्येही (Mobile Banking App) सुधारणा केली आहे. यामध्ये यूजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी इंटरफेसमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. Security feature देखील वाढविण्यात आली आहेत. बँकेने WhatsApp बँकिंग देखील वाढवले ​​आहे, ज्या अंतर्गत लोन अर्ज आणि Balance inquiry फीचर्स  जोडले  गेले  आहेत. यामध्ये नवीन पेमेंट गेटवे इंटिग्रेशन आहे. यासोबतच बँकेचे पेन्शन ग्राहक 7997714055 या क्रमांकावर मिसकॉल करून पेन्शन स्लिप मिळवू शकतील.

गृहकर्जावरील व्याजदर कमी 

गेल्या महिन्यात बहुतांश बँका गृहकर्जावरील व्याजदरात वाढ करत असताना बँक ऑफ महाराष्ट्रने व्याजदर कमी केले होते. सध्या बँकेच्या गृहकर्जावरील व्याजदर सध्याच्या 8.6  टक्क्यांवरून 8.4 टक्के करण्यात आला आहे. 8.4 टक्के व्याजदरासह, हे गृहकर्ज (home loan) बँकिंग क्षेत्रातील सर्वात स्वस्त गृहकर्जांपैकी एक आहे. Bank Protection Staff साठी विशेष व्याजदर देखील देते. 

(News Source: tv9hindi.com)