Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amitabh Bachchan's house on rent : ‘ही’ अभिनेत्री अमिताभ बच्चन यांच्या घरात राहते भाड्याने, दरमहा 'एवढे' भाडे देते

Amitabh Bachchan's house on rent

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan, Bollywood Actor) यांची गणना बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये केली जाते. बीग बींनी त्यांचे अंधेरी परिसरातील घर भाड्याने दिले आहे. या घरात कोणती बॉलिवूड सेलिब्रिटी राहते? आणि ती व्यक्ती बीग बींना किती भाडे देते? ते पाहूया.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan, Bollywood Actor) यांची गणना बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये केली जाते. काही काळापूर्वी त्यांनी बँकेला एक प्रॉपर्टी दिली होती, ज्यासाठी ते खूप चर्चेत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ यांना या प्रॉपर्टीचे लाखोंमध्ये भाडे मिळायचे. बिग बींनी त्यांचे घर देखील भाड्याने दिले आहे. एवढेच नाही तर अभिनेत्री क्रिती सेनन (Actress Kriti Senon) ही बिग-बीची भाडेकरू आहे. अभिनेत्रीने अमिताभ बच्चन यांचा अंधेरी परिसरात डुप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेतला आहे. क्रितीने दीड वर्षांपूर्वी हे घर भाड्याने घेतले होते. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी दोन वर्षांचा करारही केला आहे.

क्रिती सेनन देते एवढे भाडे

बातम्यांनुसार, क्रिती सेननने मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी मनी देखील भरली आहे, इतकेच नाही तर प्रत्येक महिन्यानुसार अभिनेत्री लाखो रुपये भाडे देते. 2020 मध्ये, अमिताभ बच्चन यांनी एक बांधकामाधीन मालमत्ता खरेदी केली ज्याची नोंदणी 2021 मध्ये झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी 31 कोटींना डुप्लेक्स आलिशान फ्लॅट खरेदी केला. हे डुप्लेक्स मुंबईतील अंधेरी भागात आहे. रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांच्या या फ्लॅटसाठी अभिनेत्री क्रिती सेनन दर महिन्याला 10 लाख रुपये भाडे देते.

जुहूची मालमत्ता स्टेट बँक ऑफ इंडियाला भाड्याने

त्याचबरोबर क्रिती सेननने 60 लाख रुपये सुरक्षा म्हणून दिले आहेत. करारही झाला आहे. कृती सेननने ते दोन वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे. काही काळापूर्वी अमिताभ बच्चन यांनी जुहूची मालमत्ता स्टेट बँक ऑफ इंडियाला भाड्याने दिली होती. बँकेने यासाठी 12 महिन्यांचा अॅडव्हान्स दिला आहे, जो कोट्यवधींमध्ये सांगितला जात आहे.