Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Multibagger Penny Stocks: स्वस्तातल्या 'या' शेअर्सनीही केली कमाल, काही महिन्यांत पैसे दुप्पट!

Multibagger Penny Stocks: स्वस्तातल्या 'या' शेअर्सनीही केली कमाल, काही महिन्यांत पैसे दुप्पट!

Image Source : navi.com

Multibagger Penny Stocks: स्वस्तात मस्त अशी कमाल काही शेअर्सनी केली आहे. या शेअर्सचं मूल्य कमी असूनही काही महिन्यांतच पैसे दुप्पट झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे उत्कृष्ट परतावा देऊन त्यांनी स्वत:ला मल्टीबॅगर असल्याचं सिद्ध केलं आहे.

भारतीय शेअर मार्केटनं अलीकडच्या काळात नवनवीन उच्चांक प्रस्थापित केले आहेत. मात्र हे वर्ष आतापर्यंत तरी शेअर मार्केटच्या दृष्टीनं फारसं चांगलं सिद्ध झालेलं नाही. वर्ष 2023चे पहिले सहा महिने आता संपले आहेत. आत्तापर्यंत बीएसई (Bombay stock exchange) सेन्सेक्स आणि एनएसई (National stock exchange) निफ्टी जेमतेम 3 टक्क्यांनी वाढले आहेत. तर या परिस्थितीतही अनेक समभागांनी उत्कृष्ट परतावा देऊन मल्टीबॅगर (Multibagger) असल्याचं दाखवलं आहे. पेनी स्टॉक्सही यात मागे नाहीत.

पेनी स्टॉक्स म्हणजे काय?

आपल्या गुंतवणूकदाराला निश्चित कालावधीत जे किमान 100 टक्के परतावा देतात, अशा समभागांना मल्टीबॅगर म्हणतात. तर दुसरीकडे जे शेअर्स अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होतात, त्यांना पेनी स्टॉक म्हणतात. त्यांच्या कमी किंमतीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांची ते पहिली पसंती असतात. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे पेनी स्टॉक हा बाजाराच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक मानला जात असतो. त्यामुळेच पेनी स्टॉक खरेदी करण्यापूर्वी पुरेसं संशोधन करावं, विचारपूर्वक पैसे गुंतवावे, असा सल्ला दिला जातो.

200 टक्क्यांहून अधिक वाढ

स्वस्त असूनही चांगला परतावा देणाऱ्या अशाच 10 स्टॉक्सबद्दल माहिती घेणार आहोत. या वर्षात आतापर्यंत उत्कृष्ट परतावा या शेअर्सनी दिला आहे. या 10 समभागांनी गेल्या सहा महिन्यांत 300 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. यामध्ये पहिलं नाव येते ते म्हणजे सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट. फक्त 26 कोटींचा एमकॅप (MCAP) असलेल्या या स्टॉकनं 2023च्या पहिल्या सहा महिन्यांत 307 टक्के वाढ दर्शवली आहे.

200 टक्क्यांहून अधिक वाढ

शीतल डायमंड्स ही कंपनी 270 टक्क्यांच्या वाढीसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हिरे आणि इतर दागिन्यांच्या व्यवसायात सक्रिय असलेली अशी ही कंपनी आहे. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर सोमा टेक्सटाइल अँड इंडस्ट्रीज ही कंपनी येते. या कंपनीनं 215 टक्के वाढ दर्शवली आहे. पेनी स्टॉक प्रकारात केवळ या 3 समभागांनी मागच्या सहा महिन्यांत 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे.

100 टक्क्यांहून अधिक वाढ

चौथा क्रमांक आर्टेमिस इलेक्ट्रिकल्स कंपनीचा आहे. या कंपनीनं आतापर्यंत 159 टक्के वाढ नोंदवली आहे. ही कंपनी एलईडी लाइटिंग क्षेत्रात काम करते. वित्तीय सेवा कंपनी फ्युचरिस्टिक सिक्युरिटीज 130 टक्क्यांच्या वाढीसह पाचव्या स्थानावर आहे. यूवाय फिनकॉर्प (UY Fincorp) सहाव्या स्थानावर आहे. या कंपनीच्या किंमतीत यावर्षी 120 टक्के वाढ झाली आहे.

100 टक्क्यांपर्यंत कोणत्या कंपन्या?

किरण प्रिंट-पॅक 115 टक्क्यांच्या वाढीसह या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ जेएमडी व्हेंचर्स या कंपनीचा क्रमांक लागतो. या शेअरची किंमत या वर्षी आतापर्यंत 111 टक्क्यांनी वाढली आहे. हिंदुस्थान बायो सायन्स आणि विनट्रॉन इन्फॉर्मेटिक्सनं या कालावधीत अनुक्रमे 103 टक्के आणि 100 टक्के वाढ दर्शविली आहे. एकूणच या स्टॉकच्या किंमती आणि कंपनीची वाढ पाहता गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा झाल्याचं दिसून येत आहे.

(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)