Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund Investment: या मिडकॅप म्युच्युअल फंडांनी 3 वर्षात दिला 30 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न

Mutual Fund Mid Cap Investment

Mutual Fund Investment: मागील 3 वर्षांमध्ये मिड कॅप कॅटेगरीतील काही म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहेत.

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना वेगवेगळ्या प्रकारच्या कॅपमध्ये गुंतवणूक केली जाते. त्यात कंपन्यांच्या भांडवलाच्या आकामानानुसार प्रामुख्याने लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप असे प्रकार पडतात. यातील मिड कॅप कॅटेगरीतील 12 स्कीम्सने गुंतवणूकदारांना डायरेक्ट गुंतवणुकीतून 30 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. हा परतावा मागील 3 वर्षातील आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (Association of Mutual Funds in India-AMFI) या संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मिड कॅप कॅटेगरीतील 12 टॉपच्या फंडांनी मागील 3 वर्षांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. या 12 मिड कॅप फंडांची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. ती म्हणजे म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत सल्लागाराची मदत घ्यावी. आम्ही तु्मच्यापर्यंत फक्त माहिती पोहचवत आहोत.

मिड कॅप कॅटेगरीतील टॉप परफॉर्मिंग फंड

Edelweiss Mid Cap Fund

इडलवाईस मिड कॅप फंडामध्ये डायरेक्ट प्लॅनमधून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मागील 3 वर्षात 32.33 टक्के परतावा दिला आहे. तर रेग्युलर प्लॅनमधून गुंतवणूक करणाऱ्यांना 30.37 टक्के  रिटर्न दिले आहेत. हा फंड निफ्टी मिडकॅप 150 टोटल रिटर्न इंडेक्सला फॉलो करत असून, यातून इडलवाईस फंडाला 32.80 टक्के रिटर्न मिळाले आहेत.

HDFC Mid-Cap Opportunites Fund

एचडीएफसीच्या मिड कॅप ऑपोरच्युनिटी फंडमध्ये डायरेक्ट गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 34.52 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून गुंतवणूक करणाऱ्यांना मागील 3 वर्षात 33.59 टक्के परतावा मिळाला आहे.

Kotak Emerging Equity Fund

कोटक इमर्जिंग इक्विटी फंडामध्ये डायरेक्ट प्लॅनमधून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 32.57 टक्के परतावा मिळाला आहे. तर रेग्युलर प्लॅनमधून गुंतवणूक करणाऱ्यांना 30.95 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत.

Mahindra Manulife Mid Cap Fund

महिन्द्रा मॅन्युलाईफ मिड कॅप फंडाने डायरेक्ट प्लॅनच्या गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना 32.28 टक्के परतवा दिला आहे. तर रेग्युलर प्लॅनमधून मागील 3 वर्षात 30.11 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

Mid Cap Fund Scheme Aug 2023

Mirae Asset Midcap Fund 

मिराई अॅसेट मिड कॅप म्युच्युअल फंडाने डायरेक्ट प्लॅनमधून गुंतवणूकदारांना मागील 3 वर्षात 33.02 टक्के परतावा दिला आहे. तर एवढ्याच कालावधीमध्ये रेग्युलर प्लॅनमधून 31.26 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

Motilal Oswal Midcap Fund

मोतीलाल ओस्वाल मिड कॅप फंडाने डायरेक्ट प्लॅनमधून 37.65 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून 36.01 टक्के रिटर्न्स मागील 3 वर्षात दिले आहेत.

Nippon India Growth Fund

निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड हाऊस निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने डायरेक्ट प्लॅनमधून गुतवणूकदारांना मागील 3 वर्षात 32.74 टक्के रिटर्न्स दिले आहेत. तर एवढ्याच कालावधीत रेग्युलर प्लॅनमधून 31.73 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

PGIM India Midcap Opportunities Fund 

पीजीआयएम इंडिया मिड कॅप ऑपोरच्युनिटी फंडाने गुंतवणूकदारांना 3 वर्षांत डायरेक्ट प्लॅनमधून 33.42 टक्के आणि रेग्युलर प्लॅनमधून 31.21 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

Quant Mid Cap Fund

क्वॉन्ट मिड कॅप फंडाच्या डायरेक्ट गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना 39.31 टक्के आणि रेग्युलर गुंतवणुकीतून 36.54 टक्के परतावा मिळाला आहे.

SBI Magnum Midcap Fund

एसबीआय मॅगनम मिड कॅप फंडाने डायरेक्ट प्लॅनमधून गुंतवणूकदारांना 34.45 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून मागील 3 वर्षात 33.27 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

Tata Midcap Growth Fund 

टाटा मिड कॅप ग्रोथ फंडाने डायरेक्ट प्लॅनमधून गुंतवणूकदारांना मागील 3 वर्षात 30.87 तर रेग्युलर प्लॅनमधून 29.25 टक्के  रिटर्न्स दिले आहेत.

Union Midcap Fund

युनिअन फंड हाऊसच्या मिड कॅप फंडाने गुंतवणूकदारांना डायरेक्ट प्लॅनमधून मागील 3 वर्षात 31.67 टक्के रिटर्न्स दिले आहेत. तर रेग्युलर प्लॅनमधून 29.87 टक्के रिटर्न दिले आहेत.

इथे दिलेल्या वेगवेगळ्या फंड हाऊसमधील मिड कॅप स्कीमचे रिटर्न हे 14 ऑगस्टच्या डेटावर आधारित आहेत. या माहितीमध्ये वापरण्यात आलेली आकडेवारी ही असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाच्या (Association of Mutual Funds in India-AMFI) वेबसाईटवरून घेण्यात आलेली आहे.

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)