FD For Senior Citizens : वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात वाढ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बहुतांश सार्वजनिक, खाजगी आणि लघु वित्त बँकांनी मुदत ठेवीवर व्याज (Interest Rate On FD) वाढवण्यास सुरुवात केली. आता अनेक लघु वित्त बँका इतर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत ग्राहकांना जास्त व्याजदर देत आहेत. तर काही स्मॉल फायनान्स बँका एफडीवर 9% पेक्षा जास्त व्याजदर देत आहेत.
सर्व बँकांनी एफडीवर अतिरिक्त व्याजदर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याची चढाओढ सुरु केली आहे. अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सगळ्यात जास्त व्याज दर देत आहेत.
Table of contents [Show]
जन स्मॉल फायनान्स बँक
जन स्मॉल फायनान्स बँक 999 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 9 % आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.60 % व्याज देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 999 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 9 % आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.60 % व्याज देत आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स ग्राहकांना जास्तीत जास्त 9.60 % व्याज देत आहे. या बँकेचे व्याजदर 4.50 टक्क्यांपासून सुरु होऊन 9.60 टक्क्यांपर्यंत आहे. हे नवे दर 5 मे पासून लागू होणार आहेत.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 888 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 8.50 % आणि ज्येष्ठ नागरिकांना 9 % व्याज देत आहे. हे नवे दर 11 एप्रिल पासून लागू होणार आहेत.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 9.00 % आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.50 % व्याज देत आहे. याशिवाय बँक 181-201 दिवसांच्या एफडीवर 9.25 % व्याज देत आहे.
ESAF स्मॉल फायनान्स बँक
ESAF स्मॉल फायनान्स बँक 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 9 % व्याज देत आहे. हे व्याज ज्येष्ठ नागरिकांना दिले जात आहे. तर सर्वसामान्य ग्राहकांना 8.50 % टक्के व्याज दिले जात आहे.