Saving Account Interest Rate: तुमचे सगळ्यांचेच बचत खाते असेलच! तर तुमच्याकरीता एक आनंदाची बातमी आहे. बचत खात्यावरील व्याजदर शिल्लक रकमेवर अवलंबून असतो. काही बँका तुमच्या बचत खात्यातील शिल्लक रकमेवर आधारित व्याज देतात. 'या' बँका बचत खात्यातील शिल्लक रकमेनुसार ७% ते ८% पर्यंत व्याज देत आहेत.
Table of contents [Show]
DCB बँक बचत खाते व्याज दर
DCB बँक 10 कोटी ते 2 कोटींपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यांवर 8 टक्के व्याज देते. बँक बचत खात्यातील 50 लाख ते 2 कोटी पेक्षा कमी शिल्लक वर 7.25% आणि 5 कोटी ते 10 कोटी पेक्षा कमी शिल्लक वर 7% व्याज देत आहे. हे व्याजदर 8 मे 2023 पासून लागू झाले आहेत.
आयडीएफसी फर्स्ट बँक
आयडीएफसी फर्स्ट बँक 10 लाखांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लकांवर 7% पर्यंत व्याज देत आहे. हे नवीन दर 1 जुलै 2023 पासून लागू झाले आहेत.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ज्या बचत खात्यामध्ये 5 लाख ते 2 कोटी रुपये शिल्लक आहेत, त्या बचत खात्यावर 7 % व्याज देत आहे. त्याच वेळी, 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या शिल्लक रकमेवर 6.75% व्याज देत आहे.
ESAF स्मॉल फायनान्स बँक
EASAF स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांतील 10 कोटी ते 2 कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक रकमेवर 7.5 टक्के व्याज देत आहे. ही बँक बचत खात्यातील 50 लाख ते 2 कोटींपेक्षा कमी शिल्लक रकमेवर 7.25% व्याज आणि 5 कोटी ते 10 कोटींपेक्षा कमी शिल्लक रकमेवर 7% व्याज देत आहे.
इतर लघु वित्त बँक
एयू स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यावर ७ टक्के व्याज देत आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यातील 5 लाख रुपयांवरील शिल्लक आणि बचत खात्यातील 50 कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेवर 7% व्याज देत आहे.