Fixed Deposit Interest Rates: गेल्या काही महिन्यांपासून देशातील जवळपास प्रत्येक बँकेने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. काही बँका त्यांच्या ग्राहकांना मुदत ठेवींवर 9.50 टक्के परतावा देत आहेत. जाणून घेऊया कोणकोणत्या बँक मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत ते.
Table of contents [Show]
जना स्मॉल फायनान्स बँक
ज्येष्ठ नागरिकांना जना स्मॉल फायनान्स बँकांमध्ये निवडक कालावधीच्या FD (Fixed Deposit) वर 9 टक्के दराने व्याज मिळत आहे. 366 ते 499 दिवसांच्या मुदतीच्या FD साठी, जना स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 9 टक्के व्याजदर देत आहे. तर 501 ते 730 दिवसांच्या दरम्यान परिपक्व (Matured) होणाऱ्या FD साठी बँकेकडून 9 टक्के व्याज दर दिल्या जात आहे. 500 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 9 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक ठराविक कालावधीच्या FD वर 9 टक्क्यांहून अधिक व्याजदर देत आहे. 181 ते 201 दिवसांच्या मुदतीच्या FD वर युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 9.25 टक्के व्याज देते आहे. 501 दिवसांत मॅच्युअर्ड होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 9.25 टक्के व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना 1001 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 9.5 टक्के दराने व्याज मिळत आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
बँक ज्येष्ठ नागरिक 1000 दिवसांत मॅच्युअर्ड होणाऱ्या FD वर 9.11 टक्के व्याजदर देत आहेत.
ईएसएफ स्मॉल फायनान्स बँक
ESAF स्मॉल फायनान्स बँक दोन वर्षे ते तीन वर्षांच्या दरम्यान मॅच्युअर्ड होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या FD वर 9 टक्के व्याजदर देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक पाच वर्षांत परिपक्व होणाऱ्या एफडीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 9.6 टक्के व्याजदर देत आहे. स्मॉल फायनान्स बँक 999 दिवसांत मॅच्युअर्ड होणाऱ्या एफडीवर 9 टक्के दराने व्याज देत आहे.