कंबोडिया, मालदीव, थायलंड, इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशांमध्ये भारतीय पर्यटकांसाठी सर्वात कमी व्हिसा फी आकारली जाते. तसेच या 5 देशांमध्ये भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हलही (VISA on Arrival) मिळतो . यामुळे भारतीयांना या देशांमध्ये प्रवास करणे सोपे आणि परवडणारे ठरते. या देशांतील भारतीयांसाठी व्हिसा शुल्क किती आहे आणि येथे प्रवासादरम्यान कोणती कागदपत्रे लागतात. याबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
Table of contents [Show]
कंबोडिया (Cambodia)
भारतीय पर्यटकांना कंबोडिया देशात प्रवेश करण्यासाठी फक्त 35 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 2,316 रुपये इतके व्हिसा शुल्क भरावे लागते. कंबोडिया देशात भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल सेवा देखील उपलब्ध आहे. फक्त कंबोडिया विमानतळावर उपलब्ध असलेला हा व्हिसा जास्तीत जास्त 30 दिवसांसाठी वैध आहे. कंबोडियाला जाताना, तुम्हाला पासपोर्ट, फोटो कार्ड आणि कंबोडियामध्ये पर्यटक म्हणून राहण्यासाठी परतीच्या कन्फर्म तिकिटाचा तपशील सादर करावा लागतो.
मालदीव (Maldives)
भारतातील बरेच पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने मालदीवला भेट देतात. एका भारतीय पर्यटकाला मालदीवसाठी 3,733 रुपये व्हिसा शुल्क भरावे लागते. मालदीवमध्ये विमानतळावरच व्हिसा ऑन अरायव्हल मिळतो. हा व्हिसा 14 दिवसांसाठी वैध आहे. यासाठी तुम्हाला पासपोर्ट, फोटो कार्ड आणि रिटर्न तिकिटाचा तपशील द्यावा लागतो.
इंडोनेशिया (Indonesia)
इंडोनेशियाला भेट देण्यासाठी भारतीयांना 2,316 रुपये व्हिसा शुल्क म्हणून भरावे लागते. हा व्हिसा 30 दिवसांसाठी वैध असतो. इंडोनेशियात विमानतळावर उतरल्यानंतर भारतीय पर्यटकांना व्हिसा ऑन अराव्हल ही सुविधा मिळते. इंडोनेशियात फिरताना आवश्यक फायनान्शिअल पुरावा सादर करावा लागतो.
थायलंड (Thailand)
भारतीय पर्यटकांना थायलंडमध्ये फिरताना तेथील चलन 1000 बाहत म्हणजेच 1834 रुपये व्हिसा फी म्हणून भरावी लागते. तसेच या देशात प्रवेश करण्यासाठी व्हिसा ऑन अरायव्हल सह टुरिस्ट व्हिसा 1,600 ते 2,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यासाठी पर्यटकांना पासपोर्ट, फोटोकार्ड आणि कन्फर्म रिटर्न तिकिटाचा तपशील जमा करण्याची आवश्यकता आहे.
भारतीय पर्यटकांना श्रीलंकेत व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा मिळते. मात्र हा व्हिसा जास्तीत जास्त 30 दिवसांसाठी उपलब्ध असतो. श्रीलंकामध्ये फिरताना पर्यटकांना पासपोर्ट, फोटोकार्ड आणि कन्फर्म रिटर्न तिकिटाचा तपशील जमा करावा लागतो. या देशातही पर्यटनासाठी आवश्यक निधी असल्याचा पुरावा जमा करावा लागतो.
Source: www.hindi.moneycontrol.com