EPFO: नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला पीएफविषयी माहिती असते. दर महिन्याच्या पगारातून ही रक्कम पीएफसाठी कापली जाते. आता सरकार जानेवारीमध्ये पीएफ खात्यात व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईपीएफओ (Employees' Provident Fund Organization) ची रक्कम खालीलप्रमाणे चेक करा. कारण व्याजाची रक्कम किती व कधी जमा झाली याचा एक साधारण अंदाज येईन.
SMS व्दारे चेक करा
तुम्ही EPFO वर जो तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे, त्या नंबरवरून 7738299899 या नंबरवर "EPFOHO UAN LAN" असे लिहून मेसेज पाठवा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल, त्या मेसेजमध्ये तुमच्या पीएफ खात्याशी संबंधित म्हणजेच ईपीएफ बॅलन्ससह इतरदेखील माहिती मिळेल.
मिस कॉल द्या
तुम्ही EPFO वर तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे, त्या मोबाईल नंबरवरून फक्त 011-22901406 या नंबरवर मिस कॉल द्या. या नंबरवर रिंग वाजल्यानंतर तुमचा मोबाईल आपोआप डिस्कनेक्ट होईल आणि थोडयाच वेळात तुम्हाला पीएफची शिल्लक रक्कम आणि तुमच्या खात्याशी संबंधित इतर सर्व माहिती एका मेसेजव्दारे मिळेल.
ऑनलाईन चेक करा बॅलन्स
तुम्ही सर्वप्रथम ईपीएफओ (EPFO) च्या या वेबसाइटवर लॉगिन करा आणि तुमची पीएफ रक्कम करा चेक. यासाठी तुम्हाला तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) माहित असणे गरजेचे आहे. त्याशिवाय हे कामच होणार नाही.
- सर्वप्रथम EPFO च्या 'MEMBER e-SEWA' वेबसाइटवर जावे.
- वेबसाइटच्या एकदम खाली 'तुमचा UAN नंबर जाणून घ्या' हा पर्याय दिसेल.
- तुम्हाला तुमचा UAN क्रमांक माहित असेल, तर 'Activate UAN' या पर्यायावर क्लिक करा.
- आता EPF पासबुक पोर्टलवर जावे आणि UAN आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे.
- पासबुक Download/View Passbook वर क्लिक करावे.
- यानंतर तुम्हाला तुमची पीएफची शिल्लक रक्कम माहिती पडेल.