ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी अवघे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. काही जणांनी रिटर्न फाईल करण्यास सुरूवात केली आहे. पण त्यामध्ये त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. जसे की रिटर्न फाईल करताना फॉर्म 26 AS मध्ये अॅडव्हान्स टॅक्सची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे रिटर्न फाईल करताना टॅक्सधारकांकडून माहिती मागवून घ्यावी लागत आहे.
प्री-फायलिंगची सोय उपलब्ध नाही
इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. रिटर्न फाईल करण्यासाठी अजून 40 दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत 41 लाख इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यात आले आहेत. मागील वर्षी रिटर्न भरताना ती प्रक्रिया अधिक सोपी आणि सुरळित व्हावी, यासाठी इन्कम टॅक्स विभागाकडून अॅडव्हान्स टॅक्स पेमेंट, कंपनी, बँक, भाडेकरू किंवा इतर संस्थांकडून कापल्या जाणाऱ्या टॅक्सची माहिती प्री-फायलिंगमध्ये दिली गेली होती. पण यावेळी अशी माहिती इन्कम टॅक्स विभागाने दिलेली नाही. त्यामुळे रिटर्न भरताना संपूर्ण माहिती नव्याने भरावी लागत आहे.
अॅडव्हान्स टॅक्सची माहिती पुरवली नाही
इन्कम टॅक्स विभागाने यावेळी रिटर्न फाईल करताना फॉर्म 26AS मध्ये अॅडव्हान्स टॅक्सची माहिती दिलेली नाही. त्यामुळे चार्टर्ड अकाउंटंटना रिटर्न फाईल करण्यात अडचणी येत आहेत. पूर्वी सीए टॅक्स स्टेटमेंट पाहून त्यातील माहितीच्या आधारे रिटर्नमधील माहिती अपडेट करत होते. पण आता ती माहितीच सीएंना दिसत नाही. ती त्यांना टॅक्सपेअर्सकडून मागवून घेऊन त्यानुसार भरावी लागत आहे.
मागील वर्षी 6.73 कोटी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल झाले होते. तर यावर्षी आतापर्यंत फक्त 41 .6 लाख रिटर्न फाईल झाले आहेत. मागील वर्षाचा आकडा पाहता अजून किमान 6 लाख टॅक्सपेअर्सना इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचे बाकी आहे.