Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PS-2 ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

PS-2 First Day Collection

Image Source : www.india.postsen.com

PS-2 First Day Collection: दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट पोन्नियन सेल्वनचा (Ponniyin Selvan) दुसरा भाग शुक्रवारी (28 एप्रिल 2023) संपूर्ण देशात रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने एका दिवसात केलेली कमाई जाणून घेऊयात.

प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक मणिरत्नम यांचा 2022 मध्ये पोन्नियन सेल्वन (Ponniyin Selvan) या चित्रपटाचा पहिला भाग चाहत्यांच्या भेटीला आला होता. त्यानंतर शुक्रवारी (28 एप्रिल 2023) या चित्रपटाचा दुसरा भाग संपूर्ण देशभरात रिलीज झाला आहे. गेल्या एक वर्षापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. अखेर चित्रपट रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी या चित्रपटाला चांगलेच डोक्यावर उचलून धरले. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 38 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या चित्रपटाच्या पहिल्या (PS-1) भागाने पहिल्या दिवशी 40 कोटी रुपयांची कमाई केली होती.

तमिळनाडू राज्यातून 25 कोटींचे कलेक्शन

PS-2 ला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या ओपनिंग डे लाच चित्रपटाने 38 कोटींची कमाई केली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार यातील 25 कोटी रुपये केवळ तमिळनाडू राज्यातून मिळालेले कलेक्शन आहे. तर आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यातून 3 ते 4 कोटी रुपयांचे कलेक्शन जमा झाले आहे. कर्नाटक राज्यात या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 4 ते 5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाबद्दल बोलायचे झाले, तर PS-1 ने देशात बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली होती.तर इंटरनॅशनल बॉक्स ऑफिसवर 169 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची कमाई केली होती.

सलग सुट्ट्यांचा होतोय फायदा

PS-2  चित्रपट शुक्रवारी देशभरात रिलीज झाला आहे. त्यानंतर सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने चित्रपट चांगलीच कमाई करेल असे सांगण्यात येत आहे. शनिवार आणि रविवार हा विकेंड असून सोमवारी महाराष्ट्र दिनाची (Maharashtra Din) सुट्टी असल्याने चित्रपट बक्कळ कमाई करेल, असे सांगण्यात येत आहे.

'या' कलाकारांनी घेतले इतके मानधन

PS-2  चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी काम केले आहे. त्यासाठी त्यांना चांगले मानधन देखील मिळाले आहे. या चित्रपटाचे बजेट 250 कोटी रुपयांचे आहे. www.cine-tales.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार PS-2  चित्रपटासाठी ऐश्वर्या राय - बच्चनने (Aishwarya Rai-Bachchan) 10 कोटींचे मानधन घेतले आहे. त्यामुळेच ती या चित्रपटाच्या स्टार कास्टमधील सर्वात महागडी दुसऱ्या क्रमांकाची कलाकार ठरली आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमने (Vikram) 12 कोटींचे मानधन घेतले आहे. ज्यामुळे तो या चित्रपटाच्या स्टार कास्टमधील सर्वात महागडा अभिनेता ठरला आहे. याशिवाय जयम रवीने (Jayam Ravi) 8 कोटी रुपये, अभिनेता कार्थी (Karthi) याने 5 कोटी रुपये आणि त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan) हिने 2.5 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे. हेच कलाकार PS-1 च्या पहिल्या भागात देखील पाहायला मिळाले होते.

Source: hindi.moneycontrol.com