टोयोटानो आपल्या आवडीच्या एमपीव्हीचे लेटेस्ट जनरेशन मॉडेल इनोव्हा हायक्रॉसची (Innova Hycross) किंमत नुकतीच बुधवारी (दि. 28 डिसेंबर) लॉन्च केली. ही कार 5 प्रकारच्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याची बेसिक किंमत 18.30 लाख ते 28.97 लाख रुपये यादरम्यान आहे.
इनोव्हा हायक्रॉस किमती (एक्स-शोरूम दिल्ली)
मॉडेल | 7-सीटर | 8-सीटर |
जी | रु. 18.30 लाख | रु. 18.35 लाख |
GX | 19.15 लाख रु | 19.20 लाख रु |
VX मजबूत-संकरित | 24.01 लाख रु | 24.06 लाख रु |
ZX मजबूत-हायब्रिड | 28.33 लाख रु | - |
ZX(O) मजबूत-हायब्रिड | रु 28.97 लाख |
इनोव्हा हायक्रॉस पॉवरट्रेन्स
नव्या पिढीतील MPV चे नवीन मॉडेल 2 लीटर पेट्रोल इंजिनासह येते. यामध्ये स्ट्रॉंग अशा हायब्रीड टाईपची निवड करण्यात आली. याची क्षमता नॉन-हायब्रीडपेक्षा अधिक शक्तीशाली आणि कार्यक्षम आहे. कंपनीचा असा दावा आहे की, ही हायब्रीड कार 21.1 किलोमीटर प्रति तास मायलेज देते. एकदा गाडीच्या टाकीत पेट्रोल भरले की, ते 1 हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापू शकते.
तपशील | हायब्रीड | नॉन-हायब्रीड |
इंजिन | 2-लिटर मजबूत-हायब्रिड पेट्रोल | 2-लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल |
पॉवर | 152PS (इंजिन) / 113Nm (मोटर) - 186PS (एकत्रित) | 174PS |
टॉर्क | 188Nm (इंजिन) / 206 Nm (इलेक्ट्रिक मोटर) | 205Nm |
ट्रान्समिशन | e-CVT | CVT |
इनोव्हा हायक्रॉस वैशिष्ट्ये
इनोव्हा हायक्रॉस ही क्रिस्टापेक्षा एक पाऊल पुढे आहे. यामध्ये प्रीमियम गोष्टींना स्थान देण्यात आले असून यात देण्यात आलेली फीचर्स वैविध्यपूर्ण आहेत. 7 इंचाचा डिजिटल ड्राईव्ह डिस्प्ले आणि 10 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली. ही सिस्टिम वायरलेस असून अण्ड्रॉईड ऑटो आणि अपल कारप्लेला सपोर्ट करणारी आहे. याचबरोबर 360 डिग्री कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकचा समावेश करण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला टोयोटा एमपीव्हीमध्ये जे फीचर्स आहेत; तशी कोणत्याही स्पर्धक कंपन्यांमध्ये नाही. तसेच हायक्रॉस ही क्रिस्टाहून एक पाऊल अडव्हान्स तर आहेच पण क्रिस्टापेक्षा प्रीमियम आहे.