व्यावसायिक कामासाठी व्हिडिओ शूट करायचा म्हटला तर सर्वात पहिल्यांदा कॅमेऱ्याचा विचार करावा लागतो. कॅमेरा चांगला हवा म्हणून त्यासाठी खूप खर्च करावा लागतो. आता तर फोनच्या कॅमेऱ्यांमधून उत्तम फोटो आणि व्हिडिओ शूट करता येतात. बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने त्याबाबतचा आपला अनुभव शेअर केला आहे. या दिग्दर्शकाचे नाव आहे विशाल भारद्वाज. त्यांनी आपल्या एका चित्रपटाचे शूट चक्क अँपल (Apple) चा iPhone 14 Pro चा वापर करुन पूर्ण केले आहे. अँपल (Apple) चा iPhone 14 Pro हा व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी आतापर्यंतचा सर्वोत्तम फोन मानला जात आहे. अॅपलने स्वतः या फोनबाबत अनेक मोठे दावे केले आहेत.
शूट केला ‘फुर्सत’
बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी या फोनच्या गुणवत्तेबाबत केले जाणारे दावे त्यांच्या नवीन लघुपटातून सिद्ध केले आहेत. विशाल भारद्वाजने या फोनवरूनच त्याचा लघुपट ‘फुर्सत’ शूट केला आहे. हा चित्रपट पूर्णपणे केवळ iPhone 14 Pro वर शूट करण्यात आला आहे.
विशाल भारद्वाज यांचे मत
विशाल भारद्वाजने संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण मोबाईल फोन कॅमेऱ्याने करण्याचा निर्णय घेऊन त्याच्या संपूर्ण युनिटलाही आश्चर्यचकित केले. ज्यानंतर विशाल भारद्वाज यांनी देखील Apple iPhone 14 Pro च्या कॅमेऱ्यावर आपले मत मांडले आहे. विशाल भारद्वाज म्हणाले की, ट्रॅडिशनल फिल्म कॅमेरा हाताळण्यासाठी दहा जणांची आवश्यकता असते. सोबत तीन अटेंडंट आणि लेन्स बॉक्स सांभाळावे लागतात. ज्यांच्या सोबत जास्त फिरता येत नाही. आयफोनवरून शूटिंग करताना या सर्व बंधनांचा सामना करावा लागला नाही. या फोनच्या अॅक्शन मोडने विशाल भारद्वाज यांनाही आश्चर्यचकित केले. या चित्रपटासाठी त्यांनी अनेक सीन्स अॅक्शन मोडमध्ये शूट केले आहेत. जे दिसायला खूप स्मूथ दिसतात. यावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल, असेसुद्धा विशाल भारद्वाज म्हणाले.
कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य
आयफोन 14 प्रो गेल्या सप्टेंबरमध्ये अनेक अपग्रेडसह लॉन्च करण्यात आला होता. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे 48 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आणि अॅक्शन मोड. स्टेबल शॉट्ससाठी, Apple ने खूप विचार केल्यानंतर अॅक्शन मोड सादर केला आहे. विशाल भारद्वाज म्हणतात की या फोनद्वारे शूट केल्यावर त्यांच्या चित्रपटाला जे स्केल मिळत आहे ते कधीच मिळू शकले नाही. यावरून आयफोनच्या स्केलचाही अंदाज लावता येतो. नवोदित चित्रपट निर्मात्यांना ही अशी सोय अगदी सहज मिळत आहे.