अॅपलचं (Apple) कोणतंही उत्पादन असो, बाजारपेठेत त्याला काही खास महत्त्व आहे. त्याच्या काही वैशिष्ट्यांमुळे लोकांमध्ये त्यानं आपलं स्थान निर्माण केलं आहे. तो आयफोन असो की आयपॅड. सर्वांनाच मागणी असते. नुकतंच कंपनीनं एक अनोखं उत्पादन 'व्हिजन प्रो' लॉन्च केलं. हे एक आय व्हेरिएबल म्हणजेच डोळ्यांना घालण्यायोग्य आहे. कंपनीनं याचं उत्पादन सुरू केलं, त्यावेळी विशिष्ट आकडा ठरवण्यात आला होतचा. मात्र आता उत्पादन लक्ष्य खूपच कमी करण्यात आल्याचं वृत्त येत आहे. यामागे काय कारणं असू शकतात, यावर चर्चा सुरू झाली आहे.
Table of contents [Show]
ठरवलं होतं 4 लाख युनिट्सचं लक्ष्य
अॅपल इंकनं पहिल्या वर्षी 'व्हिजन प्रो'चं 4 लाख युनिट्स बनवण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. आता हे लक्ष्य कमी करण्यात आलं आहे. फायनान्शियल टाइम्सनं यांसंदर्भातलं वृत्त दिलं आहे. आता अॅपलकडून केवळ 1.3 लाख ते 1.5 लाख युनिट पार्ट्सची मागणी केली जात आहे.
गुंतागुंतीचं डिझाइन
वृत्तानुसार, डिव्हाइसचं डिझाइन गुंतागुंतीचं, जटिल असल्यामुळे अॅपलला 'व्हिजन प्रो'च्या निर्मितीमध्ये अडचणी येत आहेत. अॅपलनं 'व्हिजन प्रो'च्या अंतर्गत विक्रीचं लक्ष्य पहिल्या वर्षी अनेक लाख युनिट्सनं कमी केलं आहे. अॅपलचा 'व्हिजन प्रो' गेल्या महिन्यातच सादर करण्यात आला आहे, असं चीनमधल्या 'व्हिजन प्रो'च्या उत्पादनाशी संबंधित दोन प्रमुख घटक पुरवठादारांनी म्हटलं आहे.
Apple forced to make major cuts to Vision Pro headset production plans https://t.co/ECNxECGhTf
— Financial Times (@FT) July 3, 2023
जास्त किंमत?
उत्पादनात घट होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे 'अॅपल व्हिजन प्रो'ची वाढलेली किंमत हेदेखील सांगण्यात आलं आहे. अॅपलच्या इतर महागड्या प्रॉडक्टप्रमाणेच हेदेखील अनेकांच्या बजेटच्या बाहेर असल्याचं बोललं जात आहे. या प्रॉडक्टची किंमत 3,499 डॉलर म्हणजेच तब्बल 2.85 लाख रुपये आहे. या खर्चामुळे अॅपलला त्याच्या 'व्हिजन प्रो' विक्रीच्या योजनेतून माघार घ्यावी लागली आहे. कंपनी याचं परवडणारं व्हर्जन (Affordable version) आणू शकेल, अशी अपेक्षा आहे.
वैशिष्ट्ये काय?
अॅपल व्हिजन प्रोमध्ये यूझर्सना अनेक खास फीचर्स मिळतील, होम व्ह्यूसह हे प्रॉडक्ट मिळतं. म्हणजेच, हा डिजिटल व्हर्च्युअल रिअॅलिटी चष्मा घातल्यानंतर, तुम्हाला घराच्या भौतिक भागातच (Physical area) व्हर्च्युअल स्क्रीनवर अनेक अॅप्स दिसतात. या अॅप्सचा वापर करून लोक त्यांच्या समोर बसून मेल, म्यूझिक, मेसेजेस यासह इतर अनेक वैशिष्ट्यांचा आनंद घेऊ शकणार आहेत.