आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM - Ayushman Bharat Digital Mission) अंतर्गत, लाभार्थ्यांच्या 4 कोटींहून अधिक आरोग्य नोंदी डिजिटल पद्धतीने जतन करण्यात आल्या आहेत. आयुष्मान भारत आरोग्य खाते आभा ABDM शी जोडले गेले आहे. या सुविधेमुळे लाभार्थी कधीही, कुठेही त्यांच्या डिजिटल आरोग्य नोंदींमध्ये प्रवेश आणि व्यवस्थापित करण्यास सक्षम झाले आहेत. लाभार्थी ABDM अंतर्गत पेपरलेस आरोग्य सेवांचा लाभ घेऊ शकतात.
4 कोटींहून अधिक डिजिटल आरोग्य नोंदींचे जतन
प्रत्येक व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा देण्यासाठी आयुष्मान भारत योजना राबविण्यात येत आहे. सरकारच्या या आरोग्य विमा योजनेचा आतापर्यंत 4 कोटींहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. ते सहज उपलब्ध व्हावे म्हणून त्याचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) देशासाठी डिजिटल आरोग्य इकोसिस्टम तयार करण्यात प्रगती करत आहे. लाभार्थ्यांच्या 4 कोटींहून अधिक डिजिटल आरोग्य नोंदी जतन करून एक मोठी उपलब्धी प्राप्त झाली आहे. आतापर्यंत 29 कोटींहून अधिक नागरिकांनी त्यांचे विशिष्ट आयुष्मान भारत आरोग्य खाते आभा (ABHA) तयार केले आहे.
प्रोत्साहन योजना सुरु करणार
लाभार्थी स्वत: त्यांच्या आधार खात्याशी जोडलेल्या आरोग्य नोंदींमध्ये डिजिटल पद्धतीने प्रवेश आणि व्यवस्थापित करण्यात सक्षम असतील. एनएचएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर.एस. शर्मा म्हणाले की, ABDM ची अंमलबजावणी करणारी एजन्सी म्हणून राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी काम करत आहे. ते म्हणाले की, आरोग्य नोंदींच्या डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळा इत्यादी आरोग्य सुविधांसाठी प्रोत्साहन योजना सुरू करणार आहोत. नागरिकांना डिजिटल रेकॉर्ड साठवण्यासाठी अधिक पर्याय देण्यासाठी आम्ही विविध हेल्थ लॉकर ऍप्लिकेशन्सना प्रोत्साहन देत आहोत. ते म्हणाले की, आरोग्य नोंदींचे डिजिटायझेशन करून पेपरलेस वैद्यकीय सल्लामसलत करण्याचे आमचे ध्येय आहे, जेणेकरून रुग्ण आणि आरोग्य सेवा प्रदाते यांच्यातील प्रत्येक कृती अधिक अचूकतेने करता येईल.