Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Term Insurance Plan of 5 Crore: कुटुंबाला भक्कम आधार देणारा 5 कोटींचा टर्म इन्शुरन्स प्लॅन, जाणून घ्या महत्व

5 crore Term Insurance Plan

Term Insurance Plan of 5 Crore: कधी हा विचार केलाय का तुम्ही, की अचानक कधी, कोणाला न सांगता, थोडक्यात “without warning” आपणच EXIT घेतली तर! आपण केवळ आपल्या कुटुंबाचा केवळ भावनिकच नाही, तर आर्थिक आधार देखील असतो. मग निदान आपल्या मागे आपल्या कुटुंबियांसाठी आपण एक भक्कम आधार मागे ठेऊन गेलो तर! याच उद्देशाने डिजाईन केला गेलेला प्लॅन म्हणजे 5 कोटी-टर्म इन्शुरन्स प्लॅन.

माणसाच्या आशेला, स्वप्नांना, अपेक्षांना अंत नाही. पुढील क्षणी काय घडणार आहे, याची यत्किंचितही जाणीव नसताना आपण वर्षानुवर्षांचे प्लॅन्स आखत असतो, स्वप्न बघत असतो. आणि एवढेच नाही तर, स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाच्या देखील स्वप्नांचा, ध्येयांचा, इच्छांचा भाग बनत असतो. पण कधी हा विचार केलाय का तुम्ही, की अचानक कधी, कोणाला न सांगता, थोडक्यात “without warning” आपणच EXIT घेतली तर! आपण केवळ आपल्या कुटुंबाचा केवळ भावनिकच नाही, तर आर्थिक आधार देखील असतो. मग निदान आपल्या मागे आपल्या कुटुंबियांसाठी आपण एक भक्कम आधार मागे ठेऊन गेलो तर! निदान त्यांच्या स्वप्नांसोबत, आयुष्यामध्ये निश्चित केलेल्या ध्येयांसोबत तडजोड (compromise) करावी लागणार नाही. याच उद्देशाने डिजाईन केला गेलेला प्लॅन म्हणजे "5 कोटी - टर्म इन्शुरन्स प्लॅन".

आपल्यापैकी बरेचजण जेव्हा 30 किंवा 40 वयाचे होतो तेव्हा वाढत्या वयानुसार-अनुभवानुसार करिअरमधल्या जबाबदाऱ्या वाढल्या असतात, चॅलेंजेस वाढली असतात, मोठ्या सॅलरी-पोजीशनसोबत वाढलेले वर्क-प्रेशर आणि वजन-काटा (weighing machine) यांची competition चालू असतेच. सोबत नव्याने येत राहणारी व्यक्तिगत आयुष्यामधील कर्तव्ये (लग्न, मुलांची शिक्षणं इत्यादी) देखील या स्पर्धेमध्ये मागे नसतात. आपल्या मुलांची IIT, IIM, मेडिकल, Robotics ची ध्येये, त्यांचे फ्युचर-प्लॅन्स पाहता आधी घेऊन ठेवलेले आर्थिक संरक्षण पुरेसे पडेल, याबाबत साशंकता येऊ लागते. बरेचदा प्रशस्त घराचे स्वप्न पुरे करताना गृह-कर्ज (home loan) घेतलेले असते. म्हणून अनेकदा आपल्यापैकी बरेच जण अधिक मजबूत बॅक-अपसाठी ऑपशन्स शोधतो

टर्म इन्शुरन्स प्लॅन निवडताना एक thumb rule लक्षात घ्यावा की, आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या (annual income) च्या किमान 10 पट आपले टर्म प्लॅनचे लाईफ कव्हर असावे. म्हणजे वार्षिक कमाई 30 ते 50 लाख असेल. 5 कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स घ्यावा. आपल्या वार्षिक उत्पन्नासोबतच आपले वय, आरोग्य स्थिती, आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींची संख्या, त्यांचे लाईफ-गोल्स, आपले रिटायरमेंटचे प्लॅन्स यांचा देखील विचार करणे आवश्यक आहे. याचबरोबर होम-लोन, कार-लोन, ISB सारख्या शैक्षणिक संस्थेमधील शिक्षणासाठीचे एज्युकेशन-लोन, अशी काही कर्ज घेतली असल्यास त्या कर्जाना संरक्षण म्हणून देखील आपल्या “To do list”मध्ये 5 कोटी टर्म इन्शुरन्स पॉलिसीच्या खरेदीचा समावेश करता येऊ शकेल. हा एक व्यवहार्य पर्याय आहे कारण तो इतर टर्म इन्शुरन्स पॉलिसींच्या तुलनेत जास्त विमा रक्कम ऑफर करतो.

व्यापक अर्थाने, 5 कोटीचा टर्म प्लॅन हा इतर सर्व टर्म इन्शुरन्स प्लॅनसारखाच असतो. पॉलिसीधारकाचा पॉलिसी-टर्मच्या दरम्यात मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला आर्थिक सुरक्षितता म्हणून 5 कोटी रुपयांची अमाउंट “डेथ-क्लेम” lumpsum किंवा टप्प्या-टप्प्यामध्ये दिली जाते. तसेच या Sum Assured व्यतिरिक्त “ॲड-ऑन” रायडर्स (टर्मिनल इलनेस रायडर, ॲक्सीडेंटने मृत्यू किंवा अपंगत्व रायडर, “वेवर ऑफ प्रिमिअम” म्हणजे “भविष्यातील प्रिमिअमचा भरणा माफ होणे”) पॉलिसीचे कव्हरेज वाढवतात. महत्वाचे म्हणजे, एवढे उच्च लाईफ-कव्हरेज ऑफर करूनही, या टर्म-प्लॅनसाठी “प्रीमियम खर्च” तुलनेने परवडण्यायोग्य (affordable) आहेत आणि  ज्यामुळे अनेक पॉलिसी-खरेदीदारांसाठी “5 कोटीचा टर्म प्लॅन” लोकप्रिय निवड आहे.

पाच कोटींचा टर्म इन्शुरन्स घेण्यापूर्वी विचार करा

5 कोटी टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे अशा प्रकारचे प्लॅन्स प्युअर लाईफ-कव्हर असल्याने ते संपत्तीच्या निर्मितीची हमी (wealth creation) देत नाही. ULIP सारख्या पॉलिसीज् मार्केट-संबंधित असल्याने ‘रिटर्न्स”ची हमखास गॅरेंटी जरी देत नसल्या तरी देखील, त्यामुळे संपत्ती-निर्मितीची शक्यता तरी  असते. तसेच ही पॉलिसी उच्च-उत्पन्न असलेल्या आणि तुलनेने तरुण असलेल्या व्यक्तीला खरेदी करणे शक्य होते. आपल्यापैकी अनेकांना मोठी आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करायची असल्यास किंवा आपल्या कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव आर्थिक अडथळा न येता, त्यांची स्वतःची उद्दिष्टे, स्वप्ने गाठायची असल्यास “5 कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स” हा एक भक्कम ऑप्शन असू शकतो.