Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Term Plan for Home-Makers: घराचा आधारस्तंभ असणाऱ्या गृहिणींसाठी टर्म इन्शुरन्स प्लॅन!

Term Plan for Home-Makers

Term Plan for Home-Makers: घरातील प्रत्येक कमावत्या व्यक्तीप्रमाणेच घराचा आधारस्तंभ असणाऱ्या गृहिणीचे (Home-Maker) जीवन “टर्म प्लॅन”ने सुरक्षित करणे तितकेच आवश्यक आहे.

Term Plan for Home-Makers: आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरी “ती” असते. “तिच्या”मुळे चार भिंतींच्या जागेला “घरपण” येते. “तिच्या”शिवाय घराची, किचनची, अगदी अंगणामधल्या तुळशीची जरा कल्पना करून बघा. “तिची” अनुपस्थिती घरामधल्या अनेक आर्थिक, सांस्कृतिक, भावनिक कोलाहलाचे कारण (financial, cultural & emotional chaos) बनत असते. तेव्हा घरामधल्या प्रत्येक कमावत्या व्यक्तीप्रमाणेच “ती”चे अर्थात घरामधली गृहिणीचे (home-maker) जीवन “टर्म प्लॅन”ने सुरक्षित करणे, देखील तितकेच आवश्यक आहे.

“होम-मेकर (Housewives) साठी टर्म-इन्शुरन्स” हे असे लाईफ-कव्हर आहे, जे त्या गृहिणीच्या दुर्दैवी अनुपस्थितीमध्ये कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सावरण्याची संधी प्रदान करते. भारतीय पुरुषांच्या तुलनेमध्ये भारतीय स्त्रियांचे आयुर्मान (life expectancy) जरी जास्त असले, तरी देखील त्यांच्या आरोग्याचा दर्जा मात्र निश्चितच खालावलेला आहे. अगदी अलीकडील काळामध्ये तर स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट-कॅन्सर), पीसीओडी (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) सारख्या व्याधी-आजारांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. तेव्हा त्या गृहिणीचा टर्म-इन्शुरन्स प्लम तिच्या पश्चात तिच्या नॉमिनीला, कुटुंबाला आर्थिक आधार देतो.  तिच्या एखाद्या गंभीर आजारपणामध्ये होणाऱ्या खर्चाला तोंड देण्याचे नियोजन “टर्म-इन्शुरन्स सोबतच एखादा रायडर” करू शकतो.

गृहिणींकरीता टर्म-इन्शुरन्स प्लॅन

  • ROP अर्थात “रिटर्न ऑफ प्रिमिअम” प्लॅन इन्शुअर्ड-व्यक्तीला पॉलिसी-टर्म मध्ये संरक्षण तर देतोच, परंतु जर तिने पॉलिसी-कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केला तर पॉलिसीधारकाने भरलेला प्रिमिअम इन्शुरन्स कंपनी त्याला परत करते.
  • Increasing Term Plan म्हणजे “वाढीव रक्कमेचा टर्म इन्शुरन्स प्लॅन” - बदलत्या जीवनमानानुसार व्यक्तीच्या कालपरत्वे वाढत्या गरजा भागवल्या जातील आणि तत्कालीन महागाईला तोंड देता येईल, या उद्देशाने पॉलिसीची रक्कम ठराविक काळ वाढत जाते.
  • जस-जसे गृहिणीचे वय वाढत जाते, तस-तसे तिच्यावर असणारे घराचे दायित्व, तिच्या जबाबदाऱ्या कमी होण्यास सुरुवात होते. मुलं मोठी होऊ लागलेली असतात. तेव्हा जबाबदाऱ्या विभागल्या जातात. त्यामुळे गृहिणीच्या अनुपस्थितीला रिप्लेस करणाऱ्या अधिकच्या रक्कमेची गरज देखील कमी होऊ लागते. तेव्हा अशा वेळी “कमी होणाऱ्या रक्कमेचा टर्म प्लॅन” (Decreasing Term Plan) देखील उपयुक्त ठरतो. 


“गृहिणींसाठीच्या टर्म-इन्शुरन्स” खरेदी करण्याची त्याच्या वयाची कमाल मर्यादा 60 असली, तरीदेखील काही लाईफ इन्शुरन्स कंपनीज् या वयोमर्यादेपेक्षा जास्त गृहिणींना मुदत योजना खरेदी करण्याची परवानगी देतात. काही कंपनीज् गृहिणींच्या आरोग्यावर, आजारांवर होणार खर्च कव्हर करतात किंवा काही कंपनीज् टर्म-इन्शुरन्स सोबतचे रायडर “ऍक्सिडेंटल कव्हरेज” अर्थात अपघात-प्रकरणी आर्थिक भरपाई देतात. अशा टर्म-इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम (Sum Assured) गृहिणीच्या पतीच्या वार्षिक उत्पन्नाच्या सुमारे 5 पट असणे, योग्य मानले जाते.

कोणताही टर्म-इन्शुरन्स प्लॅन खरेदी करीत असताना पॉलिसीधारकाला उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागत असतो. परंतु, 24 तासांची “होम-ड्युटी” करून देखील सॅलरी घेत नसलेली गृहिणी स्वतः टर्म प्लॅन खरेदी करू शकत नाही. मात्र, तरीदेखील  “काम न करणाऱ्या जोडीदारासाठी” टर्म-इन्शुरन्स प्लॅन खरेदी करता येतो. त्यासाठी टर्म-प्लॅन मध्ये  “जोडीदार कव्हर” (Spouse-cover) घ्यावे लागते. “Joint Term Insurance Policy” हा केव्हाही एक किफायतशीर पर्याय असतो.

“आर्थिक सुरक्षा प्रदान करणे”, हे जरी टर्म-इन्शुरन्सचे मुख्य उद्दिष्ट असले तरी देखील "गृहिणीसाठी घेतलेला टर्म प्लॅन” हा संपूर्ण  कुटुंबाची आर्थिक सुरक्षितताच सुनिश्चित तर करतोच, पण सोबतच्या रायडर्सच्या मदतीने गृहिणीला उदभवलेले गंभीर आजार-अपघात अशा आर्थिक संकटांचा सामना करणे आणि भविष्यातील मूलभूत खर्चाची भरपाई मिळणे, देखील शक्य होते.

याखेरीज भारतीय प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत, पॉलिसीधारक 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी टॅक्स बेनिफिट्स क्लेम करू शकतो. आणि याच कायद्याचे कलम 10(10D) अन्वये, पॉलिसीचे क्लेमचे पेआउट देखील नॉमिनीला करमुक्त स्वरूपात प्राप्त होते.  

नुकताच आपण 2023 या नवीन वर्षात आणि 2022-2023 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या क्वार्टर (तीन-माही) मध्ये प्रवेश केलाय. तेव्हा  “Happy New Year” म्हणत शुभेच्छा देत असतानाच “Happy Home-maker” चा संकल्प देखील पूर्ण करायलाच हवा.