Online Gaming TDS: सध्या देशभरात ऑनलाईन गेमिंगचं फॅड सुरू आहे. ऑनलाईन गेमिंगच्या भरमसाठ जाहिराती तुम्हांला टीव्हीवर,सोशल मीडियावर दिसत असतील. अल्पावधीतच ऑनलाईन गेमिंग हा प्रकार भारतात भलताच प्रसिद्धीस आला आहे.
Dream11, Rummy Circle, MPL तसेच Mycircle11 सारख्या असंख्य ऑनलाईन गेम सध्या उपलब्ध आहेत. तुम्ही देखील असेच काही ऑनलाईन गेम खेळत असाल आणि पैसे कमवत असाल तर ही बातमी तुम्ही वाचलीच पाहिजे. कारण चालू आर्थिक वर्षापासून, म्हणजेच 1 एप्रिलपासून ऑनलाईन गेमिंगमधून कमवलेल्या पैशावर मोठा कर भरावा लागणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात (Union Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून ऑनलाइन गेमिंगच्या प्रत्येक कमाईवर 30 टक्के TDS कापला जाणार आहे. याआधी TDS चे वेगळे नियम होते. 10,000 किंवा त्यापेक्षा अधिक पैशांचे बक्षीस मिळवल्यावर त्यावर कर लावला जात होता. या नियमाला बगल देण्यासाठी गेमिंग कंपन्यांनी पळवाटा काढल्या होत्या. 10 हजारांपेक्षा कमी किंमतीची बक्षिसे ठेवली जात होती. काही गेम्सवर तर 9999 रुपयांची देखील बक्षिसे होती. कर चुकावेगिरीची अशी प्रकरणे आयकर विभागाच्या निदर्शनास आली होती. याचाच परिणाम म्हणून थेट अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली गेली होती. त्यानुसार, आजपासून ऑनलाईन गेममधून जिंकलेल्या प्रत्येक रकमेवर TDS आकारण्यात येणार आहे.
What changed?
— BankBazaar (@BankBazaar) March 31, 2023
-Before March 31, 2023, TDS was imposed on winning amounts from online games if they exceeded ₹10,000.
-But from 1st April, online gaming companies are forced to levy a 30% TDS on any earnings that customers choose to withdraw.
(1.1)
काय होईल बदल?
आधीच्या नियमानुसार 10,000 रुपयांपुढील रकमेवर कर लावला जात होता. आता जिंकलेल्या प्रत्येक रकमेवर 30% कर लावला जाणार आहे. म्हणजेच जर कुणी व्यक्ती 1000 रुपये फी भरून कुठल्या गेममध्ये सहभागी झाला आणि त्याने 1000 रुपये जिंकले असतील तर त्या व्यक्तीला 9000 रुपयांवर (मिळवलेली बक्षीस रक्कम वजा सहभागीता फी) 30% TDS भरावा लागेल. नव्या नियमानुसार 2700 रुपये त्या व्यक्तीला भरावे लागतील. म्हणजेच प्रत्यक्षात त्याच्या हाती ₹6300 (9000-2700=6300) इतकी रक्कम येईल.
ऑनलाईन गेमिंगची सर्वात मोठी बाजारपेठ!
भारतात झपाट्याने ऑनलाईन गेमिंग वाढत असून, मोठ्या प्रमाणात युवावर्ग यात सहभाग घेत असल्याचे दिसते आहे. एका रिपोर्टनुसार जगातील सर्वात मोठी ऑनलाइन गेमिंगची बाजारपेठ भारतात आहे. गेल्या वर्षी 15 अब्ज डाउनलोडसह भारतात मोबाईल गेम्स खेळले जात होते.एयरटेल, जिओ सारख्या कंपन्यांनी 5G सुविधा आणल्यानंतर तर ऑनलाईन गेमिंग सुसाट धावत आहे. 2025 पर्यंत, हा उद्योग 5 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली आहे