नोकरदारांनापासून प्रोफेशल व्यक्तींना 'टीडीएस' म्हणजे एक डोकेदुखी असते. आयकर रिटर्न फाईल करताना सोबत टीडीएस सर्टिफिकेट नसतील त्यावरील कर सवलतीवर पाणी सोडावे लागते. त्यामुळे टीडीएस कापलाच असेल तर त्यासंबधी सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे. टीडीएस कशावर आकारला जातो आणि तो कशाप्रकारे टाळू शकतो हे जाणून घेऊया.
टीडीएस टाळण्यासाठी 15जी आणि 15एच अशी सर्टिफिकेट सादर केली तर टीडीएस रिफंड मिळतो. ज्येष्ठ नागरिकांना 15जी सर्टिफिकेट सादर केले की टीडीएसचा लाभ मिळतो. इतरांसाठी 15जी सर्टिफिकेट सादर करावे लागते.
वेतनावर टीडीएस
कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर कंपनीकडून टीडीएस कापला जातो. कर्मचाऱ्यांकडून वेतनाशिवाय उत्पन्नावर टीडीएस लागू होतो. मात्र उत्पन्न करमुक्त असेल तर टीडीएस सर्टिफिकेट सादर केल्यास टीडीएस क्लेम करता येतो.
व्याज उत्पन्नावर टीडीएस
बँकांमधील मुदत ठेवींमधून मिळणारे व्याज उत्पन्न टीडीएससाठी पात्र आहे. मुदत ठेव (एफडी) आणि रिकरिंग डिपॉझिटवर (आरडी) मधून 10000 रुपयांहून अधिक व्याज मिळाले तर त्यावर टीडीएस लागू केला जातो. पॅनकार्ड सादर केल्यास उत्पन्नावर 10% किंवा पॅनकार्ड नसल्यास 20% टीडीएस कापला जातो.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर टीडीएस
कर्मचाऱ्याने नोकरीची पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वी भविष्य निर्वाह निधीचे पैसे काढले तर त्यावर टीडीएस कापला जातो. मात्र पीएफची रक्कम 30000 पेक्षा कमी असल्यास त्यावर टीडीएस लागू होत नाही. इथही पॅनकार्ड सादर केल्यास उत्पन्नावर 10% किंवा पॅनकार्ड नसल्यास 20% टीडीएस कापला जातो.
प्रॉपर्टीची विक्री
स्थावर मालमत्तेची (Property Sale) 50 लाख रुपयांहून अधिक रकमेला विक्री केली तर त्यावर टीडीएस लागतो. हे पैसे मासिक हप्त्यात भरले तरी त्यावर टीडीएस लागू होतो. खरेदीदाराने ज्याच्याकडून प्रॉपर्टी विकत घेतली आहे त्याच्याकडून टीडीएस अकाउंट नंबर घेतल्यास टीडीएस कापता येईल. या बदल्यात खरेदीदार विक्रेत्याला टीडीएस सर्टिफिटकेट देईल. टीडीएसची रक्कम फॉर्म 26 क्यूबी या व्यवहारानंतर एक आठवड्याच्या आत जमा करणे बंधनकारक आहे. या व्यवहारात पॅनकार्ड सादर केल्यास विक्री मूल्यावर 1% किंवा पॅनकार्ड नसल्यास विक्री मूल्यावर 20% टीडीएस आकारला जातो.
अनिवासी भारतीयांवर टीडीएस कर
अनिवासी भारतीयांना (NRI)ठेवींवरील उत्पन्नावर टीडीएस कर द्यावा लागतो. एनआरआय व्यक्तींनी इथल्या बँकांमधील मुदत ठेवींवरील उत्पन्न 10000 रुपयांहून अधिक कमावले तर त्यावर टीडीएस लागू होतो. बँकांमधील ठेवी उत्पन्नावर 30% टीडीएस,20% कॉर्पोरेट डिपॉझिटवर, 15% टीडीएस हा अल्प कालावधीतील भांडवली नफ्यावर आणि 10% टीडीएस हा दिर्घकाळातील भांडवली नफ्यावर टीडीएस लागू होतो. मालमत्तेची विक्री केल्यास त्यावर 20% टीडीएस लागू होतो.