Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टॅक्स सेव्हिंग Ideas: 'पीपीएफ' पासून 'एनपीएस' हे 5 गुंतवणूक पर्याय तुम्हाला देतील कर बचतीचा लाभ

टॅक्स सेव्हिंग Ideas

टॅक्स सेव्हिंग Ideas: कर बचतीसाठी गुंतणूक करण्याचा पर्याय शोधत असाल तर पाच निवडक पर्याय आहेत ज्यात गुंतवणूक केल्यावर जास्तीत जास्त कर बचतीचा लाभ मिळू शकतो. या गुंतवणूक पर्यायांतून दिर्घकाळात संपत्ती निर्माण करता येईल त्याशिवाय कर बचत देखील करता येणार आहे.

कर बचतीसाठी गुंतणूक करण्याचा पर्याय शोधत असाल तर पाच निवडक पर्याय आहेत ज्यात गुंतवणूक केल्यावर जास्तीत जास्त कर बचतीचा लाभ मिळू शकतो. या गुंतवणूक पर्यायांतून दिर्घकाळात संपत्ती निर्माण करता येईल त्याशिवाय कर बचत देखील करता येणार आहे.

पीपीएफ (Public Provident Fund)

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा गुंतवणुकीच्या दृष्टीने आणि कर बचतीचा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. आयकर सेक्शन 80 सी मध्ये 'पीपीएफ'मध्ये 1.5 लाख रुपयांची कर वजावट मिळते. पीपीएफचा अल्प बचत गुंतवणूक योजनेत समावेश आहे. केंद्र सरकारकडून दर तीन महिन्यांनी अल्प बचत योजनांचे व्याजदर ठरवले जातात. सध्या पीपीएफवर  7.1% व्याजदर आहे. दिर्घकाळात पीपीएफमधून चांगला परतावा मिळवता येतो.

टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड (Tax Saving Mutual Fund)

गुंतवणुकीतून उच्च परतावा आणि कर बचतीचा दुसरा लोकप्रिय पर्याय म्हणजे टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड. इक्विटी लिंक सेविंग फंड (ELSS) हा एक नोकरदारांसाठी आणि करदात्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. ईएलएसएस म्युच्युअल फंडांत गुंतवणूक केल्यास आयकर सेक्शन 80 सीनुसार वर्षाला 1.5 लाख रुपयांची कर वजावट मिळते.

नॅशनल पेन्शन सिस्टम (National Pension System)

जोखीममुक्त गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कर बचतीचा विश्वासार्ह पर्याय म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम आहे. नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) ही केंद्र सरकारची गुंतवणूक योजना आहे. निवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासू नये, निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टम एक चांगला पर्याय आहे. नॅशनल पेन्शन सिस्टमअंतर्गत आयकर सेक्शन 80 सीसीडीनुसार वर्षाला 2 लाखांची कर वजावट मिळते. आयकर सेक्शन सीसीडी (1) नुसार 1.5 लाख आणि आयकर सेक्शन सीसीडी (1बी) अंतर्गत अतिरिक्त 50000 रुपयांची कर वजावट मिळते.2004  मध्ये  NPS या स्कीम ची सुरुवात झाली. सुरुवातीला ही स्कीम सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच सुरू करण्यात आली होती. 2009 पासून  राष्ट्रीय पेन्शन योजना सर्वांसाठी खुली झाली. वय वर्षे 18 नंतर 70 वर्षेपर्यंत यात कुणीही गुंतवणूक करू शकतो. 60 वर्षे पूर्ण झाल्यावर 60 टक्के रक्कम काढता येते तर 40 टक्के रक्कम ही पेन्शन स्वरूपात दिली जाते. 

इन्शुरन्स प्लॅन्स (Insurance Plans)

आयुर्विमा आणि आरोग्य विमा योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास प्रिमीयमची रक्कम कर वजावटीस पात्र ठरते. आयकर सेक्शन 80 सी नुसार विमा पॉलिसींवर टॅक्स एक्झंप्शन आहे. त्यामुळे विमा सुरक्षेसोबत कर बचतीचा लाभ मिळतो. आयुर्विमामध्ये विविध प्रकारच्या आयुर्विमा योजना आहेत. पारंपारिक विमा योजनांबरोबच टर्म प्लॅन, युलीप योजना आहेत. आरोग्य विमा किंवा हेल्थ इन्शुरन्समध्ये वैयक्तिक, फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स आहेत. 

भविष्य निर्वाह निधी (Provident Fund)

निवृत्तीची तरतूद करण्यासाठी केलेली गुंतवणूक म्हणजे भविष्य निर्वाह निधी. (PF) आयकर सेक्शन 80 सी नुसार भविष्य निर्वाह निधीमधील गुंतवणूक कर वजावटीस पात्र ठरते. पीएफ हा दिर्घकाळातील गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे.