Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax : टॅक्स वाचविण्याच्या गडबडीत, चुकूनही करू नका 'या' चुका

Income Tax :

Tax Saving Ideas : दीर्घकालीन भांडवली नफा (Long Term Capital Gains) आणि डेट म्युच्युअल फंडावरील (Debt Mutual Funds) इंडेक्सेशनवर 20 टक्के कराचा लाभ मिळणार नाही. मात्र,जे सध्याचे गुंतवणूकदार आहेत त्यांना हा लाभ मिळत राहील. सध्या बरेच लोक असे आहेत जे अतिरिक्त कर वाचवण्याचा पर्याय शोधत आहेत. मात्र कर वाचवण्याच्या गडबडीत होणाऱ्या चुका टाळा.

Income Tax Saving Ideas :  तुमच्या डेट म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीवर पुढील आर्थिक वर्षापासून अधिक दराने कर आकारला जाणार आहे. डेट म्युच्युअल फंडांना दीर्घकालीन भांडवली नफा (LTCG) तरतूद आणि इंडेक्सेशनसह 20% कराचा लाभ मिळणार नाही. तथापि, तुमच्या विद्यमान गुंतवणुकींना हा लाभ मिळत राहील. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, ही बातमी समोर येताच लोक टॅक्स वाचविण्याचे मार्ग शोधण्यास घाई करु लागले आहेत. मात्र तज्ञांनी सुचविलेल्या उपायांवर तुम्ही देखील एकदा नीट विचार करायला हवा.

शेअर्स विकण्याची घाई करू नका

जेव्हा जेव्हा अशा मोठ्या बातम्या येतात, तेव्हा चित्र स्पष्ट होईपर्यंत संयम ठेवा. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. थोडेसे नकारात्मक ऐकून बरेच लोक घाबरतात आणि घाईघाईने आपली गुंतवणूक विकतात किंवा गुंतवणूक करणे थांबवतात. उदाहरणार्थ, बाजारातील मोठी घसरण अनेक नवीन गुंतवणूकदारांना बाजारातून बाहेर पडण्यास भाग पाडते. निश्चितच, म्युच्युअल फंड उद्योगात सरकारवर प्रभाव टाकून निर्णय बदलण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ते मार्गदर्शक तत्त्वे बदलण्यासाठी SEBI चे मन वळवू शकतात, जेणेकरून ते नवीन उत्पादने लाँच करू शकतील. त्यामुळे घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.

शॉर्टकट शोधू नका

सध्याच्या परिस्थितीतही अनेक तथाकथित तज्ञ उपाय उपलब्ध करून देण्याचा दावा करत आहेत. तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, सरकारने बँक मुदत ठेवींच्या धर्तीवर कर्ज योजनांवर कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यावर तुमचे नियंत्रण नाही. किंबहुना, अनेक म्युच्युअल फंड व्यवस्थापक खाजगीत असेही सांगत आहेत की, सरकारला कपाती आणि सूट यातून सुटका हवी आहे. त्यामुळे भविष्यात तुमच्या गुंतवणुकीवर अधिक कर भरण्याची तयारी ठेवा. 

अनावश्यक विमा काढू नका

अनेकजण टॅक्स वाचविण्याच्या चक्कर मध्ये अनावश्यक विमा पॉलिसी खरेदी करतात. परंतु फक्त कर वाचविण्यासाठी विमा पॉलिसी खरेदी करु नका. तुम्ही करणार असणाऱ्या गुंतवणूकीचा खरोखरच तुम्हाला फायदा होणार आहे का? याचा एकदा विचार करा. 

कर बचतीच्या दृष्टीने गुंतवणूक 

गुंतवणूकीच्या फायद्यापेक्षा बचतीच्या फायद्यांकडे लक्ष दिल्याने नुकसान होऊ शकते. म्हणून आपल्या जोखमीची उद्दीष्टे काय आहे आणि आपली गरज काय आहे, हे ओळखुनच गुंतवणूक करा.

कलम 80 ई अंतर्गत दावा न करणे

कलम 80 ई अंतर्गत शिक्षण कर्जावरील व्याज भरपाई कमी करता येते. जर तुम्ही या कर्जाची परतफेड करण्यास उशीर करत असाल, तर तुम्ही चुकीचे करत आहात. कारण, यामुळे तुमच्या कर्जाच्या व्याजाचा डोंगर तर वाढतच जाणार आहे. मात्र आयकरातुनही सुट मिळणार नाही. याउलट वेळेवर पेमेंट केल्यास थकबाकी कमी होईल आणि क्रेडिट स्कोअरमध्येही सुधआरणी होईल.