Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Resolutions for FY2023: नवीन आर्थिक वर्षाचे कर नियोजन करताना, असा करा संकल्प

Tax Resolutions for FY2023:

Tax Resolutions for FY2023: नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. अनेकांनी कर बचतीच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. तरी या नवीन आर्थिक वर्षासाठी काही संकल्प करणे गरजेचे आहे; जेणेकरून तुमचा टॅक्स बचतीचा मार्ग सुलभ होईल.

प्रत्येकाची नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी विशेष संकल्पाने होत असते. तसेच, आता नुकतीच नवीन 2023-24 आर्थिक वर्षाची सुरुवात झाली. यावर्षी अखेरीस कर बचत करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. देशातील नागरिकांनी प्रत्येक करपात्र उत्पन्नावर कर भरणे आवश्यक आहे. प्रत्येक करदात्याने या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पुढील संकल्प केले तर वर्षभराचे कर नियोजन करणे सोपे होईल. 

वार्षिक माहिती विवरण काळजीपूर्वक तपासा

कर भरण्यापूर्वी वार्षिक माहिती विवरण (Annual Information Statement-AIS) काळजीपूर्वक तपासणे गरजेचे आहे. AIS मध्ये आर्थिक वर्षात करदात्याने केलेल्या सर्व व्यवहारांचा सारांश असतो. तुमचे उत्पन्न व खर्च यांची यात नोंद असते. तुमच्या वर्षभरातील उत्पन्नाची कर गणना याद्वारे केली जाते. परंतु अनेकवेळा वस्तु खरेदी करताना आपण त्यावर आवश्यक तो कर देतो. यामुळे वर्षभरात केलेल्या गुंतवणुकीवर किंवा खर्चावर कर सवलत मिळण्यासाठी आपल्याकडे हा तपशील असणे गरजेचे आहे. म्हणून टॅक्स रिटर्न भरण्यापूर्वी AIS अचूक असल्याची पडताळणी करणे गरजेचे आहे. 

कर भरताना मालमत्तेची माहिती सादर करा

कर भरताना सर्व मालमत्ता आणि देश-विदेशातील उत्पन्न सादर करावे. सर्व करदात्यांनी परदेशातून मिळवलेले उत्पन्न किंवा देशाबाहेर कोणतीही मालमत्ता असल्यास ती माहिती इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये सादर करणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स कायद्यानुसार, करपात्र उत्पन्न किंवा परदेशातील मालमत्ता उघड न केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

व्याज व लाभांश उत्पन्नावरील कर

कोणत्याही व्याज किंवा लाभांशातून मिळणाऱ्या उत्पन्नावर करदात्याला टॅक्स भरणे आवश्यक आहे. अशाप्रकारच्या उत्पन्नावर TDS तर कापला जातोच पण त्याचबरोबर करदात्यांना त्यावर स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागतो. अशा कोणत्याही प्रकारच्या करपात्र उत्पन्नावर टॅक्स न भरल्यास संबंधिताला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत मिळणाऱ्या सवलती

  • कलम 80-सी अंतर्गत कर वजावट (1.5 लाख रुपयांपर्यंत)
  • कलम 80-CCD-1b अंतर्गत कर वजावट (50,000 रुपयांपर्यंत)
  • कलम 80-D अंतर्गत कर वजावट (1 लाख रुपयांपर्यंत)
  • कलम 24 अंतर्गत कर कपात (2 लाख रुपयांपर्यंत)