अर्थव्यवस्था दरमहा विस्तारत असून वस्तू आणि सेवा करात देखील भरघोस वाढ होत आहे. केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात अप्रत्यक्ष करातून 4.75 लाख कोटींचा कर महसूल मिळाला. कर उत्पन्नात आतापर्यंत 16% वाढ झाली.
केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात चांगला कर महसूल मिळाला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत सरकारला प्रत्यक्ष करातून 379760 कोटींचा महसूल मिळाला होता. त्यात 11.18% वाढ झाली होती.
याच तिमाहीत कॉर्पोरेट क्षेत्र, एलएलपी आणि वैयक्तिक करदात्यांकडून 116776 कोटींचा आगाऊ कर प्राप्त झाला होता. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 13.7% वाढ झाली होती.
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार 10 जुलै 2023 पर्यंत सरकारला 4.75 लाख कोटींचा प्रत्यक्ष कर महसूल मिळाला आहे. त्यात 15.87% वाढ झाली. यात इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्समधून मिळालेल्या उत्पन्नात 14.65% वाढ झाली. 5.17 लाख कोटी कर रुपात सरकारला मिळाले.
1 एप्रिल ते 9 जुलै 2023 या काळात 42000 कोटींचा कर परतावा देण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रिफंडमध्ये 2.55% वाढ झाली.
अर्थसंकल्प 2023-24 नुसार चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनाचे उद्दिष्ट 18.23 लाख कोटी ठेवण्यात आले आहे. त्यातील 9.22 लाख कोटी कॉर्पोरेट टॅक्स, 9.01 लाख कोटी इन्कम टॅक्समधून प्राप्त होतील, असा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये प्रत्यक्ष करातून सरकारला 16.67 लाख कोटींचा महसूल मिळाला होता.