• 28 Nov, 2022 17:45

Tax Benefits & Privileges to Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांना मिळतात 'या' कर सवलती

Senior Citizen Tax Benefit, Health Insurance, Tax Benefit, Super Senior Citizen

Tax Benefits & Privileges to Senior Citizens :ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारे कर सवलत मिळते. 60 वर्षांपुढील वय असणारे नागरिक हे ज्येष्ठ नागरिक (सिनिअर सिटीझन) तर 80 वर्षापुढील नागरिक (सुपर सिनिअर सिटीझन) अति ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखले जातात. सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे 5 महत्वाचे लाभ जाणून घेऊ.

ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारे कर सवलत मिळते. 60 वर्षांपुढील वय असणारे नागरिक हे ज्येष्ठ नागरिक (सिनिअर सिटीझन) तर 80 वर्षापुढील नागरिक (सुपर सिनिअर सिटीझन) अति ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखले जातात. या ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या कर सवलती मिळणार हे त्या त्या वित्तीय वर्षासाठी निश्चित केले जाते. सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे 5 महत्वाचे लाभ जाणून घेऊ. यात काही वेळा सुपर सिनिअर सिटीझनसाठी आणखी विशेष सवलत मिळते. (Insurance, Tax, Interest Rates Among 5 Benefits & Privileges banks offer to senior citizens )

कर सवलत (Income Tax Benefit)

सिनिअर सिटीझन्सना आयकर स्लॅब सूट मिळते. सर्वसामान्य नागरिकांनापेक्षा सिनिअर सिटीझन्सना करमुक्त उत्पन्नाची मर्यादा जास्त असते. सुपर सिनिअर सिटीझन्सना यात आणखी सूट दिली जाते. याचा ज्येष्ठ नागरिकांना कसा फायदा होतो ते समजून घेऊया. उदा. सर्वसामान्य नागरिकांसाठी जर एखाद्या वित्तीय वर्षात 2.50 लाख इतके , सिनिअर सिटीझन्ससाठी 3 लाख आणि सुपर सिनिअर सिटीझन्ससाठी 5 लाख इतके उत्पन्न करमुक्त आहे. अशा वेळी 2.50 ते 5 लाख पर्यंतच्या उत्पन्नासाठी 5 टक्के इतक्या कराप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना 12 हजार 500 रुपये, सिनिअर सिटीझन्सना 10 हजार तर सुपर सिनिअर सिटीझन्सना एकही रुपया कर भरावा लागतं नाही.

ऍडव्हान्स टॅक्सची सवलत (Advance Tax Benefit)

ज्येष्ठ नागरिकांना ऍडव्हान्स टॅक्सचीही सवलत मिळते. सर्वसामान्य नागरिकांना ही सवलत मिळतं नाही. ज्यांची कर रक्कम 10,000 रुपयांवर असेल त्यांना ऍडव्हान्स टॅक्स भरण्यास परवानगी असते. मात्र आयकर कलम 207नुसार ज्येष्ठ नागरिकांना ऍडव्हान्स टॅक्समधून वगळण्यात आले आहे. 

मेडिक्लेमवर सवलत 

आयकर कायद्याच्या 80डी प्रमाणे मेडिक्लेम पॉलिसी घेतली असेल अशा स्थितीतही सर्वसामान्य करदात्यांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना अधिक सवलत मिळते. प्रीमियम भरत नसले तरीही मेडिक्लेम खर्चावर सवलत मिळते. पण हा खर्च रोखीत केलेला नसावा.

दुर्धर आजारांवरील खर्चाला कर वजावट ( Specified Diseases  )

80DDB प्रमाणे विशिष्ट आजार किंवा दुर्धर आजारावर उपचारासाठी (स्पेसीफाइड डिसीज) झालेल्या खर्चावरही कर वजावट मिळते. ही सवलतही सर्वसामान्य करदात्यांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना जास्त असते.

ठेवींवर जादा व्याज (Higher Interest Rate on Deposit)

कर, विमा याचप्रमाणे मिळणाऱ्या व्याजाच्या बाबतीतही ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्य करदात्यांपेक्षा जास्त सवलत मिळते. त्यातही सर्वसामान्य नागरिकांना मिळणारी सवलत ही सेव्हिंग अकाऊंटवरील व्याजावरच मिळते. बँक डिपॉझिट वर मिळतं नाही. मात्र सिनिअर सिटीझन्सना मिळणारी डिडक्शन रक्कम जास्त असतेच. त्याचप्रमाणे यात बँक डिपॉजिटचाही समावेश असतो.