टाटा सन्स (Tata Sons) कंपनीने येत्या काही वर्षांत सेमी कन्डक्टर (Semi Conductors) उत्पादनाच्या उद्योगात शिरण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन (Natarajan Chandrasekar) यांनी निक्की एशियाला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत टाटा सन्सच्या भविष्यातल्या योजना स्पष्ट केल्या आहेत. त्यात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा समावेश आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स (Tata Electronics) कंपनीच्या अंतर्गत सेमी कन्डक्टरचं उत्पादन केलं जाईल.
जगभरात इलोक्ट्रॉनिक वस्तूंसाठी लागणाऱ्या चिप्स आणि सेमी कन्डक्टरला मोठी मागणी आहे. आतापर्यंत चीन, तैवान मोठ्या प्रमाणावर आणि इतर दक्षिण आशियाई देश काही प्रमाणात जगाची ही गरज भागवत असतात. आता या स्पर्धेत भारत दमदार पाऊल टाकू शकेल.
जगाची सेमी कन्टक्टर गरज भागवणार? Tata To Enter Semiconductor’s Market
2020मध्ये टाटा समुहाने टाटा इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी स्थापन केली. तेव्हाही उद्देश सेमी कन्डक्टरपर्यंत पोहोचण्याचाच होता. पण, मधल्या कोव्हिडच्या काळात हा प्रकल्प कंपनीला थोडा काळ स्थगित करावा लागला. आणि पुन्हा एकदा कंपनीने सेमी कन्डक्टर उत्पादनाचे प्रयत्न सुरू केले आहेत.
त्याविषयीची रणनिती सांगताना चंद्रशेखरन म्हणाले की, ‘सध्या कंपनीची टाय अपसाठी इतर कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत. सेमी कन्डक्टर चिप सेटची बाजारपेठ 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी मोठी आहे. आणि त्यात विस्ताराच्या अनेक संधी आहेत. त्यामुळे टाटानेही यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.’
भविष्यात चिप फॅब्रिकेशन प्लॅटफॉर्म उभारण्याचीही टाटा समुहाचा मानस आहे. सेमी कन्डक्टर उत्पादन तसंच फॅब्रिकेशन प्रकल्प उभारणं हे आर्थिक आणि तांत्रिक दृष्ट्याही आव्हानात्मक आहे. कारण, एकतर या उद्योगात मोठी गुंतवणूक लागते. सुट्या इलेक्ट्रिक भागांची जोडणी आणि टेस्टिंग हे कामही आव्हानात्मक आहे.
त्यासाठी आगामी पाच वर्षांत टाटा समुह 90 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक या उद्योगात करणार आहे. सेमी कन्डक्टर उद्योगामध्ये प्रामुख्याने संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी लागणारे चिप सेट बनवणं याचा समावेश होतो.
टाटा इलेक्रॉनिक्सच्या इतर योजना Tata Electronics Expansion Plan
सेमी कन्डक्टर उद्योगाबरोबरच आगामी काळात टाटा समुहाला इलेक्ट्रॉनिक कार आणि त्यासाठी लागणाऱ्या बॅटरी बनवण्याच्या उद्योगात शिरायचं आहे. कोव्हिड नंतर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. आणि ती सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत होणार आहे.
टाटा इलेक्ट्रॉनिक्स भविष्यात 5G साठी लागणारी दूरसंचार उपकरणंही बनवणार आहे. आणि घरपोच सेवा देणारी अॅप तसंच सेवा विकसित करणार आहे.
टाटाची योजना प्रत्यक्षात आली की येत्या दहा वर्षात देशातील इलेक्ट्रॉनिक उद्योग 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर आकाराची होऊ शकेल. आणि अर्थातच, त्यामुळे टप्प्या टप्प्याने देशात लाखो नोकऱ्या निर्माण होणार आहेत.