Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata company IPO : टाटाची आणखी एक कंपनी आणतेय आयपीओ! पैसे कमावण्याची संधी

Tata company IPO : टाटाची आणखी एक कंपनी आणतेय आयपीओ! पैसे कमावण्याची संधी

Tata company IPO : टाटा कंपनी लवकरच आपला आणखी एक आयपीओ बाजारात आणण्यास सज्ज झालीय. आयपीओमधून पैसे कमावण्याची चांगली संधी चालून आलीय. त्याचा फायदाही अनेकजण घेण्याच्या तयारीत आहेत. टाटा कंपनी आपल्या आयपीओचा एकूण प्रभाव आणि त्याचं मूल्यांकन करण्याच्या कामात सध्या व्यस्त आहे.

चांगली कमाई करण्याच्या हेतूनं तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर टाटा मोटर्सचे शेअर्स खरेदी करण्याची संधी आहे. या आयपीओमध्ये पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवा येवू शकतो. यासाठी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा आयपीओ लवकरच शेअर बाजारात येण्याच्या तयारीत आहे. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडनं (Tata Technologies Limited) सर्वसामान्यांसाठी आयपीओ लाँच करण्यासाठी कागदपत्रे दाखल केली आहेत. जेव्हापासून ती दाखल केलीत, तेव्हापासून शेअर बाजार टाटा मोटर्सवर टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओच्या प्रभावाचं मूल्यांकन करण्यात व्यस्त असल्याचं दिसतंय.

मोठ्या नफ्याची अपेक्षा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी आयपीओ टाटा मोटर्सचा असणार आहे. या आयपीओमध्ये 8,11,33,706 टाटा टेक्नॉलॉजीजचे (Tata Technologies) शेअर्स विकू शकतात. ऑटो मेजरनं ते 7.40 रुपये प्रति शेअरनं विकत घेतले होते. आगामी दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत शेअर बाजाराला पब्लिक इश्यूची अपेक्षा असेल. अद्याप त्याची किंमत बँड जाहीर केलेली नाही. मात्र तरीदेखील टाटा मोटर्ससाठी बाजाराला मोठ्या नफ्याची अपेक्षा आहे. कारण टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सची किंमत आहे फक्त 7.40 रुपये.

तेजीत राहणार

आगामी काळात ऑटो स्टॉक तेजीत राहण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्स नवा आयपीओ आणणार आहे. म्हणजे हा आयपीओ ऑटो क्षेत्रातला असणार आहे. आयपीओ शेअर्स ज्यांना खरेदी करायचे आहेत त्या गुंतवणूकदारांनी टाटा मोटर्सचे शेअर्स जमा करावेत, असा सल्ला शेअर बाजारातल्या जाणकार, तज्ज्ञांनी दिलाय.

किंमत निश्चित नाही

टाटा टेक्नॉलॉजीजनं आपल्या आयपीओची अद्याप किंमत निश्चित केलेली नाही. मात्र टाटा मोटर्सनं टाटा टेक्नॉलॉजीजमधले स्टेक विकत घेतले त्या दरापेक्षा किमाम 4-5 पट टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची किंमत निश्चित केली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. एकूणच टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओमधून टाटा मोटर्सला मोठा फायदा मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.

भागधारकांची चांगली कमाई होणार?

भागधारकांची चांगली कमाई होऊ शकते. टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओ (Tata Technologies IPO) टाटा मोटर्सच्या भागधारकांना चांगली कमाई करून देऊ शकतं. आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ टाटा मोटर्सच्या भागधारकांसाठी मूल्य अनलॉक करू शकतो. कंपनीनं अजून आयपीओची किंमत जाहीर केलेली नाही. मात्र त्याची मार्केट कॅप सुमारे 18,000 कोटी ते 20,000 कोटी रुपये असेल, अशी खात्री आहे. हा विचार केला तर टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची किंमत सुमारे 40 रुपये प्रति इक्विटी शेअर असेल, अशी अपेक्षा गुप्ता यांनी व्यक्त केलीय.

टाटा टेक्नॉलॉजीजविषयी...

टाटा ग्रुपअंतर्गत टाटा टेक्नॉलॉजीजची स्थापना 1989मध्ये झाली. या माध्यमातून ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, औद्योगिकी यंत्रसामग्री आदींसंबंधी अभियांत्रिकी डिझाइन आणि तंत्रज्ञान सेवा देणारी ही एक कंपनी आहे. एकूण कर्मचारी संख्या 9300 आहे. टाटा मोटर्सनं टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला मान्यता दिल्यापासून याचा सटॉक लिस्टिंग न होताच तेजीत आहे. कंपनीही नफ्यात आहे. त्यामुळे आयपीओचं मूल्य त्याला अनुसरूनच ठरवलं जाणार आहे. दरम्यान, या आयपीओच्या निमित्तानं टाटा पुन्हा आपला आयपीओ बाजारात आणत आहे. याआधी तब्बल 18 वर्ष टाटाचा आयपीओ आलेला नव्हता. टीसीएसचा (Tata Consultancy Services) आयपीओ त्यावेळी आला होता. एन चंद्रशेखरन टाटा सन्सचे अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच आयपीओ येत आहे.