शेअर्सची कामगिरी आणि इतर काही कारणास्तव टाटा मोटर्सनं (Tata motors) आपल्या वाहनांमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. बाजार कमकुवत असताना अशा परिस्थितीत बीएसईवर 470 रुपये सपाट कामगिरी शेअरनं केली. तर आदल्या दिवशी 465.8-472.9 दरम्यान गडगडला. आता टाटानं आपल्या चारचाकी वाहनांच्या दरात वाढ करण्याची कारणंही सांगितली आहेत. वाहनांच्या किंमतीतली वाढ ही अंतर्गत खर्चात झालेल्या वाढीची अंशत: भरपाई करण्यासाठी करण्यात आली आहे, असं कंपनीनं म्हटलंय. व्हेरिएंट तसंच मॉडेलवर अवलंबून भारित सरासरी वाढ 0.6 टक्के असणार आहे, असं कंपनीनं म्हटलंय.
Table of contents [Show]
खर्चात वाढ
टाटा मोटर्स नियामक बदलांमुळे आणि एकूण अंतर्गत खर्चात वाढ झाल्यामुळे उत्पादन खर्च, नफा, तोटा यांचा ताळमेळ बसवणं कठीण होत आहे. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय घ्यावा लागला असं कंपनीच्या निवेदनात म्हटलं आहे. आता 1 मेपासून होणारी दरवाढ ही या वर्षातली दुसरी दरवाढ असणार आहे. फेब्रुवारीमध्येदेखील टाटा मोटर्सनं प्रवासी वाहनांच्या किंमतीत वाढ केली होती.
#TataMotors announces price hike: Cars, #SUVs to get dearer from May 1https://t.co/HjVlCejJYj
— Financial Express (@FinancialXpress) April 14, 2023
वर्षभरापासून आतापर्यंत वाढलेल्या किंमती
- जुलै 2022 - व्यावसायिक गाड्यांच्या किंमती 1 जुलै 2022पासून वाढवण्यात आल्या होत्या. 1.5 ते 2.5 टक्क्यांनी ही वाढ करण्यात आली होती. वेगवेगळ्या मॉडेलनुसार या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. जागतिक बाजारात धातुंच्या किंमतीत झालेली वाढ या दरवाढीस कारणीभूत असल्याचं कंपनीनं म्हटलं होतं.
- जानेवारी-फेब्रुवारी 2023 - टाटा मोटर्सनं आपल्या विविध श्रेणीतल्या चारचाकी गाड्यांच्या किंमती वाढवल्या होत्या. डिसेंबर महिन्यात विविध कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमती वाढवल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर विविध कारणांमुळे टाटा मोटर्सनंही आपल्या गाड्यांच्या दरात वाढ केली होती. 1.2 टक्के ही दरवाढ लागू करण्यात आली होती.
सरासरी 0.60 टक्क्यांनी वाढ
मे महिन्यात होणाऱ्या दरवाढीनंतर कारच्या किंमती सरासरी 0.60 टक्क्यांनी वाढतील. अलीकडेच जर्मनीतली सर्वात मोठी लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडीनं 1 मे 2023पासून आपल्या काही गाड्यांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केलीय. त्यानंतर आता टाटानंही ही दरवाढ जाहीर केलीय. यापूर्वी टाटा मोटर्सनं 1 एप्रिलपासून व्यावसायिक वाहनांच्या किंमतीत 5 टक्के वाढ केलीय. 27 जानेवारी 2023लादेखील टाटानं त्यांच्या सर्व आयसीई (Internal combustion engine) प्रवासी वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. 10 फेब्रुवारी 2023 रोजी, टाटा मोटर्सनं टिएगो ईव्ही (Tiago EV) या कारची किंमत सरासरी 20,000 रुपयांनी वाढवली होती.
19 टक्क्यांनी वाढले शेअर्स
देशातली महत्त्वाची कार उत्पादक कंपनी मारुतीनं या महिन्याच्या सुरुवातीलाच किंमतीत वाढ केलीय. तर ह्युंदाईनंही किंमती वाढवल्या होत्या. दरम्यान, टाटा मोटर्सचे शेअर्स 2023मध्ये आतापर्यंत 19 टक्क्यांनी वाढले आहेत. याच कालावधीत निफ्टी हेडलाइन इंडेक्स 3.2 टक्क्यांनी घसरलाय.