Give Dividend To Shareholders : टाटा मोटर्सला 2023 च्या जानेवारी ते मार्च तिमाही उत्पन्नात 5,407.79 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 1,032.84 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 35.05 टक्के वाढ महसुलात देखील झालेली आहे. तसेच भागधारकांना 2 रुपये अंतिम लाभांश देण्याचा निर्णय टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाने दिला आहे.
महसुलातही झाली वाढ
टाटा मोटर्स कंपनीने जानेवारी ते मार्च तिमाही उत्पन्नात 5,407.79 कोटी रुपयांचा एकत्रित नफा मिळवला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 1,032.84 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर चौथ्या तिमाहीतील कामकाजातून कंपनीला मिळालेला महसूल 1,05,932.35 कोटी रुपये आहे. जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 78,439.06 कोटी रुपयांच्या महसुलापेक्षा हे 35.05 टक्के अधिक आहे.
भागधारकांना लाभांश घोषित
टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाने 2 रुपये प्रति सामान्य शेअरच्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. तर DVR (Differential Voting Rights) भागधारकांना प्रति शेअर 2.1 रुपये लाभांश दिल्या जाणार आहे. एजीएममध्ये (Annual General Meeting) हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कंपनी हा लाभांश भागधारकांना दिल्या जाणार आहे.
चांगली कामगिरी करण्याचे ध्येय
आर्थिक वर्ष 2022-23 चा शेवट आमच्यासाठी चांगला होता. सर्व ऑटोमोटिव्ह वर्टिकलने चांगली कामगिरी केल्याने त्याचे चांगले परिणाम मिळाले. प्रथमच कुठल्याही तिमाही मध्ये कंपनीला एवढा चांगला नफा मिळाला आहे. टाटा मोटर्सने प्रत्येक व्यवसायासाठी बनवलेल्या वेगवेगळ्या धोरणांमुळे कंपनीला चांगले परिणाम मिळत आहे. तसेच कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये आणखी चांगली कामगिरी करण्याचे ध्येय ठरवले आहे, असे मत टाटा मोटर्स समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी पीबी बालाजी म्हणाले.