पायाभूत सेवा क्षेत्रात गुंतवणुकीची संधी देणारा टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा या क्षेत्रातील निवडक म्युच्युअल फंड योजनांपैकी एक आहे. या फंडाने शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मने गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या फंडांमध्ये टाटा इन्फास्ट्रक्चर फंडांचा समावेश होतो.
नोव्हेंबर 2004 मध्ये टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंडाची सुरुवात झाली. पायाभूत सेवा क्षेत्रातील गुंतवणूक आणि विकासाच्या संधी लक्षात घेत हा फंड तयार करण्यात आला. दिर्घकाळात संपत्ती निर्माण करण्याचा या फंडाचा प्राथमिक उद्देश आहे. पायाभूत सेवा क्षेत्राशी निगडीत कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.
टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंडाने एकूण 48 शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. यात लार्ज कॅपमध्ये 33.6% , मिडकॅपमध्ये 26.69% आणि स्मॉल कॅपमध्ये 25.54% गुंतवणूक केली आहे. इतर पर्यायांमध्ये 10.74% गुंतवणूक केली आहे. एलअॅंडटी, एनटीपीसी, ग्रींडवेल कॉर्पोरेशन, सिमेन्स, एबीबी इंडिया, डीएलएफ, अदानी पोर्ट्स, कमिन्स इंडिया अशा महत्वाच्या शेअर्समध्ये या फंडाने गुंतवणूक केली आहे.
टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंडाची 22 सप्टेंबर 2023नुसार एनएव्ही 135.27 रुपये इतकी आहे. या फंडाचे आकारमान 1300.19 कोटी इतका आहे. एक्सपेन्स रेशो 1.42% इतका आहे. क्रिसीलने या फंडाला तीन स्टार रेटिंग दिले आहे.
जोखमीचे विचार केला तर टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा उच्च जोखीम श्रेणीत येतो. या श्रेणीच्या तुलनेत टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंडाचा जोखीम रेशो 15.71% इतका आहे. 1 वर्षात या फंडाने 23.79% रिटर्न दिला आहे. इन्फ्रास्ट्रक्टचर श्रेणीचा सरासरी रिटर्न 19.94% इतका आहे. या श्रेणीचा बेंचमार्क असलेला एसअॅंडपी बीएसई इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर टीआरआयचा रिटर्न 30.54% इतका आहे. टाटा इन्फ्रास्ट्रक्चर 3 वर्षात वार्षिक 40.31% रिटर्न तर 5 वर्षात 19.75% रिटर्न दिला आहे.
टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंडात एसआयपी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. 1 वर्षासाठी एसआयपीतून 20.65% रिटर्न मिळाला. 2 वर्षात 31.67% आणि 3 वर्षात 55.07% रिटर्न मिळाला आहे. 5 वर्षात 96.9% आणि 10 वर्षात 159.83% परतावा मिळाला आहे.