Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेचा आयपीओ आजपासून ओपन

Tamilnad Mercantile Bank IPO

Tamilnad Mercantile Bank IPO : तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेचा आयपीओ (Initial Public Offer-IPO) आज (दि. 5 सप्टेंबर) ओपन झाला असून तो 7 सप्टेंबरपर्यंत खुला असणार आहे. बॅंकेने या आयपीओच्या माध्यमातून 863 कोटी रुपये उभे करण्याचा मानस व्यक्त केला.

Tamilnad Mercantile Bank IPO : खाजगी क्षेत्रातील देशातील सर्वांत जुनी बॅंक म्हणून परिचित असलेली तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेचा आज (दि. 5 सप्टेंबर) आयपीओ ओपन झाला असून तो 7 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. तमिळनाड बॅंकेच्या आयपीओचा प्राईस बॅण्ड 500-525 रुपये असून कंपनी आयपीओच्या माध्यमातून 832 कोटी रुपये उभे करणार आहे. या माध्यमातून जमा झालेल्या निधीमधून बॅंक भांडवली गरजा पूर्ण करणार आहे. 

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेच्या आयपीओचा इश्यू लॉट साईज 28 शेअर्स इतका आहे. मागील 3 आठवड्यांपासून आलेला हा तिसरा आयपीओ आहे. यापूर्वी आलेले दोन आयपीओ सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी (Syrma SGS Technology) आणि ड्रीमफोक्स सर्व्हिसेसला (DreamFolks Services) गुंतवणूकदारांकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.


गुंतवणूकदारांनी काय करायला हवे?

एजकॉन ग्लोबलच्या एका रिपोर्टनुसार, अप्पर प्राईस बॅण्डवर तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेच्या आयपीओची पोस्ट बुक व्हॅल्यु 1.35 पट आहे. जी चांगली मानली जात आहे. बॅंकेला असलेली 100 वर्षांची परंपरा, निष्ठावान ग्राहक आणि बॅंकेच्या सर्व्हिस फ्रेमवर्कमध्ये सुधारणा करण्याच्यादृष्टीने बॅंकेने टाकलेले पाऊल हे महत्त्वाचे मानले जात आहे.

ग्रे मार्केट प्रीमिअम (Grey Market Premium)

मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेच्या (Tamilnad Mercantile Bank IPO GMP) आयपीओची ग्रे-मार्केटमध्ये (Grey Market Price-GMP) आजची किंमत 30 रुपये आहे. ग्रे मार्केटमधील परफॉर्मन्सवरून एक्सपर्टच्या मते तमिळनाड बॅंकेचा शेअर 555 (525 रुपये + 30 रुपये) रुपयांपर्यंत लिस्टिंग (TMB Share Price) होईल. जो आयपीओच्या प्राईस बॅण्डच्या अप्पर किमतीपेक्षा 5.71 टक्के जास्त आहे.

सुमारे 100 वर्षांची परंपरा असलेली तमिलनाड बॅंक ही देशातील सर्वांत जुनी खासगी बॅंक आहे. ही बॅंक प्रामुख्याने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह शेतीसाठी आणि किरकोळ ग्राहकांना कर्ज देते. 15 सप्टेंबरला तमिलनाड बॅंकेच्या इश्युचे मार्केटमध्ये लिस्टिंग होऊ शकते.