Car launch in September: पुढील महिन्यात, होंडा, टोयोटासह पाच कंपन्यांच्या SUV मार्केटमध्ये लाँच होणार आहेत. गणेशोत्सव जवळ आला आहे. तसेच पुढील काही महिन्यात नवरात्र, दसरा आणि दिवाळी आहे. या काळात नव्या कारची खरेदी तेजीत असते. त्यामुळे आघाडीच्या कंपन्यांकडून खास हा मुहूर्त साधून नव्या कार लाँच करण्यात येतात.
नव्या कार लाँच बरोबरच जुने मॉडेल नव्या रुपात म्हणजेच फेसलिफ्ट मॉडेल्सही सप्टेंबर महिन्यात बाजारात येतील. डिझाइन आणि फिचर्समध्ये बदल करून कंपनीकडून गाडी पुन्हा नव्याने लाँच केली जाते. पाहूया कोणत्या कंपनीच्या कार्स ग्राहकांच्या भेटीला येणार आहेत.
होंडा एलेवेट (Honda Elevate)
होंडा कंपनीच्या कार वापरणारे ग्राहक भारतात अगदी कमी आहेत. मात्र, होंडा ब्रँड आयडेंटिटी जपून आहे. एकूण बाजारातील कार विक्रीपैकी सुमारे दीड टक्के गाड्या होंडाच्या आहेत. होंडाची एलेवेट ही बहुप्रतिक्षित कार पुढील महिन्यात लाँच होत आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील ही गाडी आहे.
ह्युंदाईची क्रेटा, किया सेल्टोस, व्होक्सवॅगन टिग्वान, स्कोडा कुशाक या गाड्यांशी ऐलेवेट स्पर्धा करेल. या गाडीला 1.5 लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. 4 सप्टेंबरला ही गाडी लाँच होण्याची शक्यता आहे.
टाटा नेक्सॉन (फेसलिफ्ट)
टाटा कंपनीची नेक्सॉन ही गाडी भारतीय बाजारात ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. एसयूव्ही सेगमेंटमध्ये नेक्सॉन विक्रीमध्ये वरच्या क्रमांकावर आहे. आता ही गाडी नव्या रुपात ग्राहकांसमोर येत आहे. कंपनीने गाडीच्या आतील फिचर्स आणि बाहेरील डिझाइनमध्ये बदल केले आहेत.
14 सप्टेंबरला ही गाडी लाँच होण्याची शक्यता आहे. गाडीच्या अधिकृत लाँचआधीच गाडीची डिझाइन मार्केटमध्ये लिक झाली होती.. पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंडमध्ये गाडी आहे. 1.2 लिटर पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन व्हेरियंटमध्ये गाडी उपलब्ध आहे. 5 गियर मॅन्युअल आणि 7-speed DCT transmission गाडीला देण्यात आले आहे.
नेक्सॉन इव्ही फेसलिफ्ट (Nexon EV Facelift)
नेक्सॉन पेट्रोल, डिझेल गाडीच्या डिझानसोबतच टाटाने इलेक्ट्रिक नेक्सॉन व्हेरियंटमध्येही बदल केला आहे. इलेक्ट्रिक व्हर्जन चार मिटर SUV श्रेणीतील ही बेस्ट सेलिंग कार आहे. 2019 साली लाँच झाल्यानंतर गाडीत कोणतेही अपडेट देण्यात आले नव्हते. रेग्युलर नेक्सॉन सोबत इव्ही मॉडेलही लाँच केले जाईल.
सिएट्रॉन सी 3 एअरक्रॉस (Citroen C3 Aircross)
सिएट्रॉन या फ्रान्सच्या कंपनीकडून C3 Aircross हे चौथे मॉडेल भारतात लाँच केले जाईल. ही गाडी कॉम्पॅक्ट एसयुव्ही श्रेणीतील असून ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस, होंडा एलेवेट आणि इतर SUV सोबत स्पर्धा करेल. या गाडीची किमत इतर SUV पेक्षा थोडी कमी असल्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात ही कार लाँच होईल.
टोयोटा रुमिनो (Toyota Rumion)
टोयोटा कंपनी पुढील महिन्यात रुमिनो ही मल्टी पर्पज व्हेइकल श्रेणीतील कार लाँच करणार आहे. ही कार मारुती एर्टीगाचे रिबॅज्ड व्हर्जन आहे. मात्र, या गाडीत बदल करण्यात आले आहेत. एर्टिगापेक्षा या गाडीची किंमत जास्त असण्याची शक्यता आहे. या गाडीची किंमत 10.29 ते 13.68 लाखांच्या दरम्यान असू शकते.