शेअर बाजारात आज झालेल्या चौफरे घसरणीत शुगर स्टॉक्समध्ये देखील होरपळून निघाले आहेत. आज मंगळवारी शेअर बाजारात शक्ती शुगर्स 7.55% घसरण झाली. सिम्भॉली शुगर्स 7.16%, राणा शुगर्स 5.11%. मगध शुगर्स 4.33%, कोठारी शुगर्स 5.13, के.एम शुगर्स 3.92%, धामापूर शुगर मिल 3.41%, केसीपी शुगर 3.37%, पोनी शुगर 3.05% आणि विश्वराज शुगर इंडस्ट्रीज 2.91% ने घसरले.
दुसऱ्या बाजुला धारीणी शुगर अॅंड केमिकल्स 4.35%, उगर शुगर्स 3.00%, डीसीएम श्रीराम इंडस्ट्रीज 1.17%, बजाज हिंद 0.53%, त्रिवेणी इंजिनिअरिंग 0.42% नी वधारले. गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने शुगर कंपन्याच्या शेअरमध्ये घसरण झाली.
आज मंगळवारी शेअर बाजारात सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 189 अंकांनी कोसळला.सेन्सेक्स मंचावरील सर्वच्या सर्व 30 शेअरमध्ये आज घसरण झाली. ज्यात एसबीआय, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, टीसीएस, रिलायन्स, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, एचयूएल, मारुती, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, एनटीपीसी या शेअरमध्ये प्रचंड घसरण झाली आहे.
निफ्टी 50 मध्ये अदानी एंटरप्राईस, अल्ट्रा टेक सिंमेट, अॅक्सिस बँक हे शेअर वधारले आहेत. हिंदाल्को इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, यूपीएल, जेएसडब्ल्यू स्टील, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, एलअॅंडटी, आयशर मोटोर्स, एशियन पेंट्स, हिंदुस्थान यु्निलिव्हर , टाटा स्टील या शेअरमध्ये घसरण झाली आहे. बाजार बंद होताना सेन्सेक्स 103 अंकांच्या घसरणीसह 61702 अंकांवर स्थिरावला. निफ्टी 35.15 अंकांच्या घसरणीसह 18385 अंकांवर स्थिरावला.