Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

15 inch MacBook Air: ॲपलचा जगातील सर्वात स्लिम लॅपटॉप! विद्यार्थ्यांना मिळतेय 10 हजारांची सूट…

MacBook Air

आता भारतात ॲपलचे अधिकृत स्टोअर असल्यामुळे ग्राहकांना नवनव्या प्रोडक्ट्सची वाट बघावी लागणार नाहीये. भारतात या खास लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 1.34 लाख रुपये इतकी असणार आहे. सोबतच जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्याकडे कॉलेज अथवा युनिव्हर्सिटीचे अधिकृत ओळखपत्र असेल तर तुम्हाला खरेदीवर 10 हजारांची सूटही मिळणार आहे!

दिग्गज टेक कंपनी ॲपलने त्यांच्या वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्स-WWDC23 मध्ये 15-इंच डिस्प्ले असलेला जगातील सर्वात पातळ/स्लीम (11.5 mm) लॅपटॉप MacBook Air लाँच केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या लॅपटॉपची जोरदार चर्चा केली जात होती. ॲपल लव्हर्स मंडळी या MacBook Air ची उत्सुकतेने वाट बघत होते. अखेर, काल रात्री हा लॅपटॉप ॲपलने लाँच केला असून आता जगभरात तो विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

आता भारतात ॲपलचे अधिकृत स्टोअर असल्यामुळे ग्राहकांना नवनव्या प्रोडक्ट्सची वाट बघावी लागणार नाहीये. भारतात या खास लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 1.34 लाख रुपये इतकी असणार आहे. सोबतच जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्याकडे कॉलेज अथवा युनिव्हर्सिटीचे अधिकृत ओळखपत्र असेल तर तुम्हाला खरेदीवर 10 हजारांची सूटही मिळणार आहे! आहे की नाही फायद्याची ऑफर? चला तर जाणून घेऊयात या जगातील सर्वात पातळ लॅपटॉप MacBook Air ची खास वैशिष्ट्ये.

मॅकबुक एअर,15 इंच

जगातील सर्वात पातळ 15 इंचाचा लॅपटॉप भारतात 1.34 लाख रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ॲपलचे लॅपटॉप हे त्यांच्या दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटरीसाठी ओळखले जातात. या खास लॅपटॉपबद्दल बोलायचे झाले तर हा लॅपटॉप 18 तासांचा बॅटरी बॅकअप देणारा आहे.

यात मिडनाईट, स्टारलाइट, सिल्व्हर आणि स्पेस ग्रे असे चार रंग उपलब्ध आहेत. नवीन MacBook ची वैशिष्ट्ये 13-इंचाच्या MacBook Air M2 सारखीच आहेत. मॅगसेफ चार्जिंगसह 3.5 मिमी हेडफोन जॅक, दोन थंडरबोल्ट पोर्ट आदी सुविधा वापरकर्त्यांना मिळणार आहे.

लिक्विड रेटिना डिस्प्ले 

नवीन मॅकबुक एअरमध्ये एक प्रशस्त, हाय-रिझोल्यूशन 15.3-इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे, ज्यामुळे युजर्सला लॅपटॉपवर काम करताना उत्तम अनुभव घेता येणार आहे . 500 निट्स पर्यंत या लॅपटॉपची ब्राइटनेस असणार आहे. तसेच रेटिना डिस्प्ले असल्यामुळे स्क्रीन देखील गुणवत्तापूर्ण अनुभव देणार आहे. 

हा लॅपटॉप 100GB/s मेमरी बँडविड्थ प्रदान करतोआणि 24GB पर्यंत वेगवान युनिफाइड मेमरीला समर्थन देतो, त्यामुळे एकाच वेळी अनेक कामे या लॅपटॉपवर करता येणार आहे. मॅकबुक एअरवरील 1080p फेसटाइम HD कॅमेरा फेसटाइम कॉल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी अनुभवता येणार आहे. प्रगत इमेज सिग्नल प्रोसेसरच्या प्रोसेसिंग पॉवरसह, वापरकर्ते व्हिडिओ कॉलवर स्पष्ट दिसणार आहेत.तसेच थ्री-माइक अॅरे बीमफॉर्मिंग अल्गोरिदम वापरून हा लॅपटॉप  क्लिअर ऑडिओ कॅप्चर करतो, त्यामुळे वापरकर्ते व्हिडिओ कॉलचा वापर देखील विना व्यत्यय घेऊ शकणार आहेत.