Trade setup for today: देशांतर्गत शेअर बाजारात, शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहाराला ब्रेक लागला. बीएसई (BSE: Bombay Stock Exchange) सेन्सेक्स 206.81 अंकांच्या म्हणजेच 0.34 टक्क्यांच्या घसरणीसह 59 हजार 751.22 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे एनएसई (NSE: National Stock Exchange) निफ्टी 32.30 अंकांच्या म्हणजेच 0.18 टक्क्यांच्या घसरणीसह 17 हजार 825.90 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.
हे समभाग सेन्सेक्सवर पडले (These stocks fell on the Sensex)
आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बीएसई सेन्सेक्सवर एचसीएल टेक (HCL Tech) शेअर्स 1.23 टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), अॅक्सिस बँक (Axis Bank), एचडीएफसी (HDFC), एचडीएफसी बँक (HDFC Bank), लार्सन अँड टुब्रो (L&T), महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), सन फार्मा (Sun Pharma), आयटीसी (ITC) आणि नेस्ले इंडिया (Nestlé India) आदी कंपन्यांचे समभाग (Shares) लाल चिन्हासह व्यवहार करत होते.
हे समभाग चढत्या क्रमाने व्यवहार करत होते (These stocks was booming)
टाटा स्टील (Tata Steel), इंडसइंड बँक (IndusInd Bank), पॉवरग्रिड (PowerGrid), बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv), एनटीपीसी (NTPC), एसबीआय (SBI), इन्फोसिस (Infosys), मारुती (Maruti), अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech Cement), टाटा मोटर्स
(Tata Motors) आणि कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) सेन्सेक्सवर सुरुवातीच्या व्यवहारात हिरव्या रंगात व्यवहार करत होते.
शुक्रवारी 18 कंपन्या डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. यामध्ये, विप्रो (Wipro), लार्सन अँड टुब्रो फायनान्स होल्डिंग्ज (Larsen & Toubro Finance Holdings), आदित्य बिर्ला मनी (Aditya Birla Money) या कंपन्यांचा समावेश आहे.
सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 66.5 अंकांच्या म्हणजेच 0.37 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होणार असल्याचे संकेत मिळत होते.अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरुवात जोरदार झाली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 81.26 वर उघडला. मागील सत्रात तो 81.55 च्या पातळीवर बंद झाला होता.