SBI Credit Card Rules : स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी. स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसने 1 मे 2023 पासून काही नियमांत बदल केले आहे. याबाबतची माहिती बँकेने आपल्या वेबसाइटवर दिलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देतात, आणि कार्डच्या प्रकारानुसार ऑफर बदलतात. तर जाणून घेऊया क्रेडिट कार्ड नियमांत काय बदल झालेत?
SBI क्रेडिट कार्डमध्ये झालेले बदल पुढीलप्रमाणे
SBI कार्डच्या वेबसाइटनुसार, AURUM कार्डधारकांना यापुढे 5 लाखांच्या माइलस्टोन खर्चावर RBL Luxe कडून मिळणारे 5,000 चे कुपन मिळणार नाही. त्याऐवजी 1 मे 2023पासून Tata CLiQ Luxury कडून एक व्हाउचर मिळेल. EasyDiner Prime आणि लेन्सकार्ट गोल्ड मेंबरशिपचे फायदे 1 मे पासून AURUM कार्डमध्ये उपलब्ध असणार नाहीत.
1 मे 2023पासून, 5X रिवॉर्ड पॉइंट्सऐवजी, सिंपलीक्लिक SBI कार्ड आणि सिंपलीक्लिक अॅडवांटेजद्वारे भाडे पेमेंट व्यवहारांवर 1X रिवॉर्ड पॉइंट दिले जात आहेत.1 एप्रिल 2023 पासून, SBI कार्डने सिंपलीक्लिक SBI कार्ड आणि सिंपलीक्लिक अॅडवांटेजसह लेन्सकार्ट ऑनलाइन शॉपिंगवर 10X रिवॉर्ड पॉइंट्सऐवजी 5X रिवॉर्ड पॉइंट्स मिळवण्यास सुरुवात केली आहे.
क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंटवर प्रोसेसिंग फी वाढवली
तुमच्या कार्डवर अजूनही Apollo 24X7,बुक माय शो (Bookmyshow) क्लियर ट्रीप (Cleartrip) EasyDiner आणि नेटमेडस (Netmeds) वरून ऑनलाइन खरेदीवर 10X रिवॉर्ड पॉइंट मिळेल. कंपनीने क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंटवर प्रोसेसिंग फी वाढवली आहे. एसबीआय कार्डने यूजर्सना पाठवलेल्या एसएमएसमध्ये सांगितले होते की, आता त्यांना 99 रुपये टॅक्सऐवजी 199 रुपये टॅक्स भरावा लागेल.
हे नियम 17 मार्च 2023 पासून लागू झाले आहेत. तुम्हाला सुद्धा SBI क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर, अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असले पाहिजे. पगारदार आणि स्वयंरोजगार असलेले लोक SBI क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात.
(News Source: https://hindi.news18.com)