Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

थोड्याच पैशात सुरू करताय शेअर बाजारात गुंतवणूक?

थोड्याच पैशात सुरू करताय शेअर बाजारात गुंतवणूक?

शेअर मार्केट काहींना निराश करतो तर काही सट्टेबाजांना मोठं ही करतो. मग किरकोळ गुंतवणुकदारांसाठी शेअर बाजार खरंच सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे का?

जर तुम्हाला कोणी सांगितले की तुम्ही दिवसाचे काही तास घरात किंवा ब्रोकरच्या ऑफिसमध्ये स्क्रीनसमोर घालवून पैसे आणि बरेच काही कमावू शकता किंवा कदाचित तुम्ही एखाद्या श्रीमंत गुंतवणुकदारापासून प्रोत्साहित होवून त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करत असाल. तुम्ही शेअर बाजारात उडी घेण्याचे कारण काहीही असो, तासनतास स्क्रीनकडे टक लावून पाहा. वेगवगळे बिझनेस चॅनेल ट्यून करा, टिप्स मिळवा आणि तुमच्या ब्रोकरकडून मिळालेल्या सल्ल्याचे काटेकोरपणे पालन करा. तरीही काही महिन्यांनंतर तुम्ही तुमचे ट्रेडिंग कॅपिटल गमावले  किंवा अगदी वाईट म्हणजे सर्वकाही गमावले? बहुतेक सट्टेबाज कधीतरी या सर्वकाही गमावल्याच्या नैराशात्मक भावनेतून गेलेले असतात. मार्केटने काहींची साफ निराशा केली, तर काही सट्टेबाज पुढे मोठे व्यापारी बनले आणि काहींनी स्वतःला किरकोळ गुंतवणूकदार म्हणवून घेतले. किरकोळ गुंतवणुकदारांवर अशी वेळ का येते? हे आपण समजून घेऊया. 

मार्केट टिप्स वर जास्त अवलंबून राहणे

बाजारातील सर्वात मोठा गुन्हेगार म्हणजे टिप्स. बहुतेक सर्वसाधारण गुंतवणुकदारांचा असा विश्वास असतो की जर त्यांच्याकडे ती किलर टीप असेल तरच ते मार्केटचे राजे बनू शकतात. आणि जेव्हा या टिप्स मार्केटमधल्या प्रसिद्ध लोकांद्वारे दिल्या जातात तेव्हा तुम्ही त्या टिप्स वापरुन मालामाल होण्याची स्वप्नं बघता . दुर्दैवाने या टिप्सचा पूर्ण फायदा तुम्हाला घेता येत नाही. तुम्हाला असे सल्ले मिळत असताना त्याचे काय करायचे आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा हे तुम्हाला सांगितले जात नाही. पुढे त्या स्थितीतून कधी बाहेर पडायचे याबद्दल कोणी काहीच सांगत नाही. परिणामी हाती निव्वळ तोटा येऊन तुम्ही हात चोळत राहता आणि स्वत:च्या नशिबाला शिव्या देत त्यातून बाहेर पडता.      

ओव्हर ट्रेडिंग 

शेअर बाजारात लोकांनी रोजच गुंतवणूक केली पाहिजे , असा एक गैरसमज निर्माण करुन ठेवला गेला आहे. प्रत्यक्षात दैनंदिन गोष्टीत रोज खरेदी विक्री साठी पुरेसे भांडवल सर्वसामान्य नोकरी करणाऱ्या व्यक्तींकडे असणं शक्य नसते. रोजच्या कामाप्रमाणे शेअर मार्केटमध्ये वेळ घालवणे हे घातक ठरु शकते.      

शेअर मधला पैसा सोपा पैसा असतो      

किरकोळ गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये पैसे कमावणे हा नशिबाचा भाग मानतात. पैसे कमवायला नशिबाशिवाय अन्य काहीही लागत नाही, असा त्यांचा विश्वास असतो. पण सत्य परिस्थिती यापेक्षा खूप वेगळी असू शकते. हुशार आणि चांगले गुंतवणुकदार कसे तयार होतात. ते फक्त भाग्यावर अवलंबून राहात नाहीत याचा विचार करायला हवा. शेअर बाजारात कुठलीही गुंतवणुक करण्यापूर्वी  ते त्या कंपनीबद्दल समजून घेऊन वाचन, विश्लेषण आणि संशोधन करण्यासाठी बराच वेळ देतात. वॉरन बफेने हे याबाबत म्हटले आहे की, "मी तुम्हाला फक्त वीस स्लॉट असलेले तिकीट देऊन तुमची  आर्थिक स्थिती सुधारू शकेन. जेणेकरून तुम्हाला वीस वेळा संधी मिळेल. पण तुम्ही एकदा कार्ड पंच केल्यावर अजून गुंतवणुक करु शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जे काही कराल ते खूप विचारपूर्वक करा." ह्या विधानाप्रमाणे मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अभ्यासपूर्ण गुंतवणूक केली पाहिजे .  

सतत शेअर मार्केटकडे लक्ष ठेवताना अन्य महत्वाच्या गोष्टींचा विसर पडणे. किरकोळ गुंतवणूकदार मार्केटच्या चढ उतारावर इतकं लक्ष केंद्रित करतात, की ते विसरतात की आयुष्यात अन्य देखील खूप साऱ्या गोष्टी आहेत. यामुळे कुटुंबाला किंवा मित्र परिवाराला वेळ देता येत नाही. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम दिसू लागतो. सट्टा बाजार खूप साहसी आहे. गुंतवणुकदारांना असं वाटते की ते गुंतवणूक करत आहेत. पण प्रत्यक्षात ते सट्टा बाजार करत असतात जे तुमचा खूप वेळ घेतं आणि इतकं करुनगी कधी कधी तुमच्या हातात काहीच लागत नाही.