Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

mission majnu cast: सिद्धार्थ मल्होत्राला रश्मिका मंदानाच्या दुप्पट फी, अन्य कलाकारांना किती?

Mission Majnu

Image Source : www.twistarticle.com

Rashmika and Siddharth Malhotra : आपल्याकडे फिल्म इंडस्ट्रीत हीरो आणि हिरॉईनच्या फी मध्ये असणारा फरक तसेच अन्य महत्वाच्या कलाकारांना किती पैसे मिळाले आहेत, हा नेहमी चर्चेचा विषय ठरत असतो. सध्या गाजणाऱ्या mission majnu या चित्रपटात या दोघांपैकी कुणी किती फी घेतली आहे, ते नक्की जाणून घ्या.

रश्मिका  आणि  सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ‘मिशन मजनू’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून लोकांमध्ये त्याची उत्सुकता वाढली होती. अखेर हा चित्रपट 20 जानेवारीला OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. 'मिशन मजनू' या चित्रपटात रश्मिका  मंदाना आणि  सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. यांच्यासह चित्रपटात काम केलेल्या  स्टार्सनी त्यांच्या कामासाठी किती पैसे घेतले आहेत ते जाणून घेणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. 

Siddharth Malhotra vs Rashmika Mandana कुणाला किती पैसे ?

मिशन मजनू या सिनेमाच्या स्टारकास्ट आणि त्यांना दिलेले पैसे याविषयीची माहिती वेळोवेळी माध्यमातून प्रसिद्ध झाली आहे. ती एकत्र करून तुमच्यासमोर ठेवत आहोत. सिद्धार्थ मल्होत्रा जो आपल्या या सिनेमाचा हीरो आहे. त्याची फी सर्वात जास्त असेल हे तर उघडच आहे. सिद्धार्थ मल्होत्राने भारतातील रॉ फील्ड ऑफिसरची भूमिका या सिनेमात साकारली आहे. या चित्रपटासाठी सिद्धार्थ मल्होत्राने 7 कोटी रुपये इतकी फी घेतली आहे.  या चित्रपटात रश्मिका मंदाना हीने  अंध मुलीची भूमिका केली  आहे. रश्मिका मंदानाने  या चित्रपटासाठी 3 कोटी रुपये इतकी फी घेतली आहे. म्हणजे सिद्धार्थ मल्होत्राने रश्मिकापेक्षा दुपटीहून अधिक फी घेतल्याचे दिसते. यात परमीत सेठीनेही  चांगली फी आकारली आहे. तो बऱ्याच दिवसांनी चित्रपटात दिसणार आहे. त्याने 'मिशन मजनू' या चित्रपटात काम करण्यासाठी 75 लाख रुपये घेतले आहेत.

‘विक्रम वेधा’ तुम्हाला आठवतोय का? 

यात शारीब हाश्मीचा अभिनय लक्ष वेधून घेणारा ठरला होता..  मीर सरवरने या 'मिशन मजनू' या चित्रपटासाठी 40 लाख रुपये इतकी  फी घेतली आहे. त्याची वेगळी शैली या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असंही म्हटल जातय. तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर याविषयी नक्की कमेंट करून सांगा. ही होती या सिनेमातील महत्वाच्या कलाकारांच्या मानधानविषयीची माहिती. याला साजेसा असा त्यांचा अभिनय झालाय का, हे जर हा चित्रपट तुम्ही बघितला असेल तर आम्हाला नक्की सांगा.