• 08 Jun, 2023 00:39

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sri Lanka Financial Crisis: भारताचे कर्ज फेडण्यासाठी श्रीलंकेने IMF कडून घेतले कर्ज

Sri Lanka

Sri Lanka Economic Crisis: मागच्या वर्षी श्रीलंकेत आर्थिक संकट आले असताना शेजारधर्म म्हणून आणि मित्रदेश म्हणून गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भारताने श्रीलंकेला 4 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत दिली होती. तसेच IMF चे बेलआउट मिळवून देण्यासाठी श्रीलंकेला मदत करणारा भारत हा पहिला देश ठरला होता.

Sri Lanka Debt: भारताचा शेजारी असलेला श्रीलंका हा देश सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मागील वर्षी श्रीलंकेत मोठी अनागोंदी माजली होती. आता कुठे या देशाची आर्थिक परिस्थिती पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेने International Monetary Fund (IMF) कडून $330 दशलक्ष रुपयांचे कर्ज मिळवले आहे. मिळालेलं कर्ज श्रीलंकेने भारताकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरलं आहे हे विशेष.

भारताकडून घेतलेल्या कर्जाचा पहिला हफ्ता देण्यासाठी या कर्जाचा वापर श्रीलंका करणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःची पारदर्शी ओळख निर्माण करण्यासाठी श्रीलंका कायम तत्पर असल्याचे दिसून येते आहे. गेल्या 2 वर्षांपासून बिघडलेली देशाची आर्थिक घडी पुन्हा सुधरविण्यासाठी शक्य ते प्रयत्न श्रीलंका सरकारकडून केले जात आहेत.येणाऱ्या काळात भारताच्या दृष्टीने श्रीलंकेची विश्वासार्हता नक्कीच वाढेल, यात काही शंका नाही. 

कर्ज भरण्यात येत होत्या अडचणी 

देशासमोर उभ्या राहिलेल्या आर्थिक संकटानंतर श्रीलंकेला कर्ज फेडता येत नव्हते.आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे सरकारच्या तिजोरीत ठणठणाट होता. अशा परिस्थितीत शेजारधर्म म्हणून आणि मित्रदेश म्हणून गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भारताने श्रीलंकेला 4 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत दिली होती. तसेच IMF चे बेलआउट मिळवून देण्यासाठी श्रीलंकेला मदत करणारा भारत हा पहिला देश ठरला होता.

IMF कडून सशर्त कर्ज 

IMF ने श्रीलंकेला सशर्त कर्ज देण्याचे मान्य केले आहे. श्रीलंकेला या कर्जाची परतफेड 48 महिन्यांच्या कालावधीत करायची आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी देशात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असताना लोक अन्न, इंधन आणि औषध खरेदीसाठी रस्त्यावर उतरले होते.जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. सरकारी यंत्रणा सामान्य नागरिकांनी हाती घेतल्यामुळे देशात अराजकता पसरली होती. एवढेच नाही तर जनक्षोभामुळे  राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना कुटुंबियांसह देश सोडून पळून जावे लागले होते. त्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांनी देशाची सूत्रे हाती घेतली आहेत.पर्यटनाला चालना देऊन देशाची आर्थिक चाके पुन्हा रुळावर आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. 

श्रीलंकेच्या अर्थमंत्र्यांनी  दिली माहिती

श्रीलंकेचे अर्थ राज्यमंत्री रंजित सियामबालापिटिया (Ranjith Siyambalapitiya) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, भारताकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी घेतलेल्या कर्जातून $120 दशलक्ष वापरले गेले आहेत. राज्यमंत्री रंजित पुढे असेही म्हणाले की, अलिकडच्या काळात भारताने औषध आणि इंधनासह जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी आपल्या देशाला कर्ज दिले होते. या कर्जाचा काही भाग गुरुवारी भारत सरकारला देण्यात आला आहे. कर्ज परतफेडीच्या अंतिम मुदतीचे पालन करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि ते आम्ही वेळेवर करू असे देखील ते म्हणाले.