Singapore and Malaysia Tour Package Of IRCTC: IRCTC केवळ तुम्हाला देशात प्रवास करण्यासाठी परवडणारी टूर पॅकेजच देत नाही, तर आता तुम्ही परदेशात प्रवास करण्यासाठी IRCTC आलिशान टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता. IRCTC च्या नवीन 'Enchanting Singapore and Malaysia' पॅकेजद्वारे, तुम्ही 7 दिवस आणि 6 रात्रीचे टूर पॅकेज घेऊ शकता आणि आशियातील दोन सुंदर देशांना भेटण्याची तुमची ईच्छा पूर्ण करु शकता.
मिळणारे लाभ कोणते?
IRCTC तर्फे उपलब्ध करण्यात आलेल्या या टूर पॅकेजचे नाव ENCHANTING SINGAPORE AND MALAYSIA आहे. हे पॅकेज बुक करणारे प्रवासी 20 नोव्हेंबर 2023 रोजी प्रवास करू शकतात. IRCTC या 7 दिवस आणि 6 रात्रीच्या टूर पॅकेजमध्ये, IRCTC त्यांच्या वतीने प्रवाशांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मोफत देत आहे. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना विमान, बस, हॉटेल, जेवण, गाईड तसेच एस्कॉर्ट आणि विमा या सुविधा दिल्या जात आहेत.
खर्च किती?
IRCTC टूर पॅकेजसाठी तुम्हाला सिंगल ऑक्युपन्सीसाठी 1,63,700 रुपये खर्च करावे लागतील. तर डबल आणि ट्रिपल ऑक्युपन्सीसाठी 1,34,950 रुपये खर्च करावे लागतील. जर 5 वर्षे ते 11 वर्षांच्या मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला विद बैड ऑक्यूपेंसी करीता 1,18,950 रुपये खर्च करावे लागतील. तसेच, 2 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी विदाउट बैड ऑक्यूपेंसी करीता 103100 रुपये मोजावे लागतील.
मलेशिया आणि सिंगापूर हे ठिकाण जगातील सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांसाठी अतिशय आकर्षक आहे आणि IRCTC च्या टूर पॅकेजची किंमतही अतिशय परवडणारी आहे. जर तुम्हाला मलेशिया आणि सिंगापूर फिरायला जायचे असेल, तर तुम्ही या पर्यायाचा विचार करू शकता. तसेच तुम्ही आयआरसीटीसी वेबसाइट वर जाऊन हे टूर पॅकेज बुक करू शकता.